सोलापूर

बार्शीत नऊ तोळे सोने, रोख 35 हजार रुपये लुटले

प्रशांत काळे

बार्शी शहर पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

बार्शी (सोलापूर) : शहरातील वाणी प्लॉट येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापकाच्या घरी पाचजणांनी काठीने मारहाण करुन व चाकूचा धाक दाखवले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत दरोडा टाकला असून सोने- चांदीच्या दागिन्यासह रोख 35 हजार रुपये असा पाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. बार्शी शहर पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वानपथक, ठसे तज्ञ दाखल झाले आहेत. (In Barshi, thieves have stolen gold and money)

गजेंद्र गेना जाधव (वय 68) सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना रविवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान घडली. घरामध्ये पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असताना चॅनेल गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मी आणि पत्नी हॉलमध्ये असताना रात्री दोनच्या सुमारास जाग आली. त्यावेळी माझ्या जवळ दोन जण उभे होते, त्यापैकी एकाजवळ लाकडी दांडके व चाकू होता. पत्नी उषा जवळ एक जण दांडके घेऊन उभा होता तर दोन जण हॉलमधील कपाटाजवळ उभे होते. सर्वजण 25 ते 30 वयोगटातील होते, सर्वांनी तोंडाला रुमाल बांधला होता.

माझ्या जवळ उभा असलेल्याने चाकू दाखवून दांडके उगारुन चुप बैठने का, हिलने का नही, तुम्हारे पास पैसा है, तुम हिले तो बुढ्ढी को मार देंगे अशी धमकी देऊन दांडके माझ्या पायावर मारले. कपाटाचा दरवाजा तोडून सामान्य अस्ताव्यस्त करुन कपाटातील 43 ग्रॅमचे सोन्याचे गंठण, 20 ग्रॅमचे मिनी गंठण, 7 ग्रॅमची कर्णफुले, 10 ग्रॅमच्या दोन अंगठ्या, 4 ग्रॅमचे मण्याचे पदक असलेले मंगळसूत्र, 3 ग्रॅमची अंगठी, 1 ग्रॅमची नथ नऊ तोळे सोने व रोख 35 हजार असा पाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.

अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, उपअधिक्षक अभिजित धाराशिवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करीत आहेत. (In Barshi, thieves have stolen gold and money)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT