bribe 
सोलापूर

सासुरे येथे मतदानासाठी पैसे वाटप ! अखेर सोशल मीडियावरील "त्या' व्हिडिओ क्‍लिपवरून दोघांवर गुन्हा दाखल

The incident took place in Sasure village where money was distributed for Gram Panchayat voting

वैराग (सोलापूर) : सासुरे (ता. बार्शी) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदाराला पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरून ग्रामपंचायत निवडणूक आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा एका महिलेसह दोघांविरोधात झाला आहे. प्रशांत भारती व चंद्रकला भारती असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची घटना 15 जानेवारी रोजी मतदाना दिवशीच घडली होती. 

याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सासुरे (ता. बार्शी) येथे 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायत मतदान प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या वेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाली होती. त्या व्हिडिओ क्‍लिपमध्ये मतदाराला पैसे वाटप करून मतदान करण्याचे आवाहन करत असल्याचे स्पष्ट झाले होते. एक व्यक्ती पैसे वाटप करताना व एक महिला पैसे घेताना दिसत होती. या प्रकाराची ग्रामपंचायत निवडणूक आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणाऱ्या भरारी पथकाने दखल घेऊन व व्हिडीओ क्‍लिप ताब्यात घेतली. 

निवडणूक भरारी पथक प्रमुख एस. एच. गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल रामेश्वर शिंदे, पोलिस शिवाजी मुंडे व गाव कामगार पोलिस पाटील शीतल लक्ष्मण करंडे यांनी त्या व्हिडिओ क्‍लिपचा पंचनामा सासुरे येथील प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात केला. क्‍लिपमधील पैसे वाटप करणारा प्रशांत अर्जुन भारती (रा. सासुरे) हा असून, पैसे घेणारी महिला चंद्रकला दिगंबर भारती (रा. सासुरे) ही असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची फिर्याद भरारी पथक प्रमुख सयाजी गायकवाड यांनी वैराग पोलिसांत दिल्याने त्या दोघांविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तसा अहवाल 15 जानेवारी रोजी वरिष्ठांना सादर झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Rate Today: चांदीचा भाव 2 लाख रुपये होणार? 6 महिन्यांत इतकी वाढली किंमत; जाणून घ्या कारण

Satara: धक्कादायक! 'मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार'; फलटण तालुक्यातील प्रकार, विवस्त्र फोटो पोस्ट अन्..

NCERT New History Book: बाबर क्रूर विजेता तर औरंगजेब हा मंदिरे तोडणारा; ‘एनसीईआरटी’च्या आठवीच्या नव्या पुस्तकातील माहिती

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा खमंग 'गोड ढोकळा', सोपी आहे रेसिपी

Satara News:'महाबळेश्वरात अतिक्रमण हटविताना गोंधळ'; शासकीय कामात अडथळा, आठ जणांवर गुन्हा, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

SCROLL FOR NEXT