Airport
Airport 
सोलापूर

बोरामणी विमानतळासाठी स्वतंत्र अधिकारी ! वीसपैकी आठजणांच्या जमिनीची खरेदी; 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार संपादन 

तात्या लांडगे

सोलापूर : बोरामणी विमानतळासाठी आवश्‍यक 29 हेक्‍टर जमिनीचे संपादन युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने अप्पर जिल्हाधिकारी दीपक नलावडे यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्‍त केले आहे. त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता. 19) 20 पैकी आठ शेतकऱ्यांकडून खरेदीखत करून त्यांना दहा कोटी रुपये देण्यात आले. 

होटगी रोडवरील विमानतळाचा समावेश केंद्र सरकारच्या उडान योजनेत करण्यात आला. मात्र, अडथळ्यांची शर्यत पार करण्यात अद्याप यश आलेले नाही. श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्यासह विविध प्रकारचे अडथळे निर्माण झाल्याने या विमानतळावरून ही योजना सुरू झालेली नाही. दरम्यान, आता होटगी विमानतळाबरोबरच बोरामणी विमानतळाचा विकास करण्याचे नियोजन युद्धपातळीवर सुरू झाले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बोरामणी विमानतळाच्या पुढील विकासकामांसाठी शासनाकडून निधी मागितला जाणार आहे. त्यात केंद्र सरकार व राज्य सरकारचा 50-50 टक्‍के निधी असणार आहे, असे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील दोन वर्षांत विमानतळाचा विकास करून सुरू करण्याचे नियोजन केले जात असल्याचेही सांगण्यात आले. 

ठळक बाबी... 

  • बोरामणी विमानतळासाठी आतापर्यंत संपादित झाली 550 हेक्‍टर जमीन 
  • वन विभागाला प्राधिकरणाने दिली पर्यायी 34 हेक्‍टर जमीन 
  • 20 शेतकऱ्यांपैकी आठजणांकडून खरेदी केली जमीन; दहा कोटी वितरीत 
  • उर्वरित 16 शेतकऱ्यांच्या जमीन खरेदीचे दस्त तयार; 15 दिवसांत पूर्ण होईल कार्यवाही 
  • 29 हेक्‍टर जमीन खरेदीनंतर प्राधिकरण राज्य सरकारला पाठविणार अहवाल 

20 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल भूसंपादन प्रक्रिया 
बोरामणी विमानतळासाठी आवश्‍यक 29 हेक्‍टर जमिनीचे संपादन करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू झाली आहे. एकूण 20 शेतकऱ्यांपैकी आठ शेतकऱ्यांकडील जमिनीची खरेदी काल (मंगळवारी) झाली आहे. आता 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण होईल. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचवालक दीपक कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली गतीने काम सुरू आहे. 
- दीपक नलावडे, 
अप्पर जिल्हाधिकारी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, मुंबई 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT