solapur Sakal
सोलापूर

Solapur : मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांवर विमा कंपनीकडून अन्याय

अग्रिम देण्यास नकार; बळिराजामध्ये संताप, ऑनलाइन तक्रारी नोंद

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा, ता. ३० : यंदाच्या खरीप हंगामात विमा भरलेल्या शेतकऱ्याची नुकसान भरपाई देताना विमा कंपनीने मरवडे, बोराळे, भोसे या तीन महसूल मंडलातील शेतकऱ्याला अग्रिम देण्यास नकार दिल्यामुळे या मंडलमधील शेतकऱ्यांवर विमा कंपनीकडून अन्याय सुरुच आहे. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात तालुक्यातील ६८ हजार शेतकऱ्यांनी ५२ हजार हेक्टरवर बाजरी, थोर, मका, कांदा या पिकाचा विमा भरला होता यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे ही पिके जळून गेली तर विहिरीतील पाण्यावर आलेली पिकांची अवकाळीने नुकसान केले.

अशा परिस्थितीत सलग २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने तालुक्यातील सुरवातीला दोन महसूल मंडलमधील शेतकऱ्यांचा समावेश केला होता मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेल्या आंदोलनामुळे व आमदार समाधान आवताडे यांनी प्रयत्न केल्यामुळे आणखी तीन महसूल मंडळाचा यामध्ये समावेश झाला. मरवडे, बोराळे आणि भोसे या तीन महसूल मंडल मधील शेतकऱ्यांना २१ दिवसाचा खंड नसल्याचा कारणावरून रक्कम देण्यास नकार दिला.

ज्या शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत ऑनलाइन तक्रार केली त्यांनाच फक्त नुकसान भरपाई मिळणार आहे. एक नोव्हेंबरला शासनाने कृषी व महसूल खात्याने दिलेल्या अहवालाच्या आधारावर दुष्काळी तालुका म्हणून समावेश केला असताना देखील विमा कंपनी नुकसान भरपाई देताना आखडता हात घेत असल्याबद्दल शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

जळालेल्या पिकाची ७२ तासाच्या आत ऑनलाइन तक्रार करूनही देखील पाहणी केली नाही. पीक नुकसानीमुळे दुष्काळ जाहीर होऊन सुद्धा अग्रिम रक्कम न देण्याचे विमा कंपनीचे धोरण चुकीचे आहे.

- दत्तात्रय शिंदे, शेतकरी

पिकांची कृषी व महसूल खात्याने केलेल्या पंचनाम्यातून माहिती आम्ही विमा कंपनीला कळवली आहे मात्र २१ दिवसांचा खंड नसल्याच्या कारणावरून बाजरी व मका या पिकास अग्रिम देताना काही मंडळ विमा कंपनीने वगळले आहे.

- गणेश श्रीखंडे, तालुका कृषी अधिकारी

सुरवातीला फक्त दोनच मंडलचा समावेश केला. संघटनेच्या आंदोलनामुळे आणखीन तीन मंडलाची वाढ झाली. मात्र दुष्काळी निकषांमध्ये पाटकळ मंडल नसताना विमा कंपनी अग्रिम देते यावरून विमा कंपनीचा कारभार हा पक्षपातीपणाचा आहे. दुष्काळ जाहीर झाल्याने सर्वच मंडलला अग्रिम द्यावे अन्यथा पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल.

- अॅड, राहुल घुले, अध्यक्ष

युवा आघाडी,

स्वाभिमानी शेतकरी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT