palak melawa.jpg 
सोलापूर

विद्यार्थी व पालक मेळाव्यात अभ्यासाच्या प्रश्न सोडवणूकीसाठी साधला संवाद

जगन्नाथ हुक्केरी

अक्कलकोट (सोलापूर)ः जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत सस्नेह मेळाव्यात विद्यार्थी व पालकांमध्ये शाळा बंद असल्याने नेमके अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 
येथील मराठी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत यमाजी होते . 
यावेळी मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी सांगितले की, अनेक महिन्यापासून शाळांना सुट्टी आहे. मुले जास्तीत जास्त बाहेर फिरताना दिसत आहेत. घरात बसणे कमी पण फिरणे जास्त झाले. घरात ऐकत नाहीत व अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. मोबाईल घेऊन गेम खेळतात अश्‍या अनेक तक्रारी पालक सांगत असतात. याकडे जबाबदारीने पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक दिवसांच्या लॉकडाउन काळानंतर आत्ता कूठे सुरळीत जनजीवन सुरू आहे. नोकरी व शेतीची कामं यासह अनेक जबाबदाऱ्या पालकांना पार पाडाव्या लागतात. वेळ अपुरा पडतो. बाहेर जायची घाई असतान मुलाना मोबाईल हवा असतो. 
त्यात घरात दोन तीन मुलं असतील तर एकाच मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास कसा करणार किंवा बघणार हा मोठा प्रश्न निर्माण होतो. पालकांपुढे चिडचिड व लेकरांची भांडण या सगळ्या गोष्टी रोजच्या झाल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी पालकांनी स्वतः लक्ष देऊन घरात सामंजस्य निर्माण करावे असे त्यांनी सांगितले. 
आपल्या शाळेत शिक्षकांच्या घरी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे अभ्यास घेतला जातो. त्याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन केले. आम्ही शिक्षक विद्यार्थ्यासाठी नेहमीच तत्पर आहोत. एकंदरीत मुलं कमी वेळ खेळणे व जास्त वेळ अभ्यास करणे याकडे कसे लक्ष देतील हे पालक .शिक्षक या दोघांचीही जबाबदारी राहील असेही त्यांनी स्पष्ट केले. 
एकाच वेळी शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा घेण्याचा दुग्ध शर्करा योग शिक्षकांनी जुळवून आणला. शारदा कापसे, मनिषा कूणले यांनी पण पालक व विद्यार्थ्याना अभ्यासाची गोडी कशी लावावी याविषयी मार्गदर्शन केले. चंद्रकांत यमाजी यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी बहूसंख्येने पालक व विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित होते. अनेक पालकांनी आपली मते व्यक्त केली. शारदा कापसे यांनी सर्वांचे आभार मानले .  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT