Sangramsinh Patil
Sangramsinh Patil 
सोलापूर

तेलंगणमध्ये प्रवेश करण्याच्या नक्षली प्रयत्नांना पंढरपूरचे सुपुत्र आयपीएस संग्रामसिंह पाटील यांनी दिला धक्का !

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : तेलंगण राज्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या ग्रामीण भागात शिरकाव करण्याचे माओवादी गेले काही दिवसांचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्याविरोधात पंढरपुरचे सुपुत्र, आयपीएस संग्रामसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मोहीम राबवत मनुगुरू लोकल ऑर्गनायझिंग स्क्वाड या दलाचा नेता रव्वा रामल ऊर्फ सुधीर व त्याचा एक सहकारी लकमा या दोघांचा रविवारी एका चकमकीत खात्मा केला. 

पंढरपूरचे सुपुत्र असलेले डॉ. संग्रामसिंह पाटील यांनी पंढरपूर, अकलूज व पुणे येथे शिक्षण घेतल्यानंतर कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 151 रॅंक मिळवली. हैदराबाद येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर तेलंगणमध्ये भद्राचलम जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. सध्या ते तेलंगणमधील मुलगु जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांच्याकडे भूपलपल्ली जिल्ह्याची देखील अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे. कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवलेले डॉ. संग्रामसिंह पाटील हे तेलंगण, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील गडचिरोली सीमेवर अत्यंत महत्त्वाची कामगिरी करत आहेत. 

तेलंगण राज्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या ग्रामीण भागात शिरकाव करण्याचे माओवादी गेले काही दिवस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना रविवारी तेलंगण पोलिसांनी केलेल्या एका धाडसी कारवाईमुळे मोठा धक्का पोचला. मुलुगु जिल्हा पोलिसांनी मंगापेटा येथील जंगलात एक धाडसी कारवाई करून बंदी घातलेल्या मनुगुरू लोकल ऑर्गनायझिंग स्क्वाड या दलाचा नेता रव्वा रामल ऊर्फ सुधीर व त्याचा एक सहकारी लकमा यांचा एका चकमकीत खात्मा केला. रामन याला पकडण्यासाठी चार लाखांचे इनाम पोलिसांकडून जाहीर करण्यात आले होते. 

तेलंगणमधील मुलगु येथे जिल्हा पोलिस अधीक्षक संग्रामसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. रविवारी दुपारी आदिवासी पाडाजवळ ही चकमक झाली. चकमकीनंतर दोन एके-47 रायफलसह मोठ्या प्रमाणावर दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. 

पंढरपूरचे सुपुत्र असलेले डॉ. संग्रामसिंह पाटील तेलंगणमध्ये करीत असलेले काम निश्‍चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT