Jitada
Jitada 
सोलापूर

उजनी जलाशयात हा "जिताडा' आला कुठून? प्राणीशास्त्रज्ञ व मच्छिमारांनाही पडला प्रश्‍न; वजन नऊ किलो

राजाराम माने

केत्तूर (सोलापूर) : नेहमीच या ना त्या कारणाने उजनी जलाशय चर्चेत असते. या वेळी मात्र उजनी जलाशयावर यापूर्वी कधीही न सापडलेला "जिताडा' जातीचा मासा नुकताच मच्छीमारांना आढळून आला. हा मासा 350 रुपये किलो या दराने बोली लावून दत्तात्रय लोखंडे या व्यापाऱ्याने भिगवण मच्छी मार्केटमध्ये खरेदी केला. नऊ किलो वजनाच्या या एकाच माशाचे 3150 रुपये व्यापाऱ्याने कमावले. 

भिगवण येथील मच्छी मार्केटमध्ये महाडिक या प्रसिद्ध व्यापाऱ्याकडे सोमवारी (ता. 1) 350 रुपये किलो या दराने एका ग्राहकाने हा नऊ किलोचा मासा खरेदी केला. या माशाचे तब्बल 3 हजार 150 रुपये झाले. हा मासा उजनी जलाशयात कोणत्या भागात व कोणत्या मच्छिमारांना सापडला, हे मात्र समजू शकले नाही. जिताडा या जातीचा हा मासा उजनी जलाशयाच्या पाण्यात सापडत नाही. या माशाचे संगोपन तलावात केले जाते. परंतु, गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून फुटले होते. त्यातूनच हा मासा उजनी जलाशयात दाखल झाला झाला असावा, अशी चर्चा होत होती. या माशामध्ये औषधी गुणधर्म असल्याने त्याला मोठी मागणी असते. विशेष म्हणजे कोलकता, हावडा येथील व्यापारी तो आवर्जून नेतात. 

सोलापूरला उजनी जलाशयातून 19 जानेवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान नदी, कॅनॉल व बोगद्याद्वारे पाणी सोडण्यात आले होते. या वेळी जलाशयातून सरासरी 31 टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी कमी झाले आहे. सध्या जलाशयाचा पाणीसाठा 68.48 टक्के एवढा कमी झाला आहे. जलाशयाचा पाणीसाठा एकदम कमी झाल्याने मच्छिमारांनाही मासे सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. 

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीत पूरक शेती म्हणून जिताडा माशांचे पालन करतात. राज्यातील रायगड जिल्ह्यातील खाडी प्रदेशात हा मासा विपुल प्रमाणात आढळून येतो. काही ठिकाणी या माशाला "खजूर मासा' या नावानेही ओळखतात. या माशात प्रथिने व खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. या कारणामुळे या माशाला खवय्यांकडून मोठी मागणी असते. विशिष्ट प्रकारचा हा मासा उजनीच्या पोटात सापडल्याने जैवविविधतेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरले आहे. 
- डॉ. अरविंद कुंभार,
प्राणीशास्त्र अभ्यासक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT