solapur siddheshwar yatra sakal
सोलापूर

स्वच्छतेच्या जागरात आपणही सहभागी व्हा! रविवारी होम मैदानावर ‘सकाळ’तर्फे स्वच्छता मोहीम

‘‘माझं सोलापूर, स्वच्छ सोलापूर... सुंदर सोलापूर, माझी जबाबदारी’ हे ब्रीद घेऊन सोलापुरातील नागरिकांना स्वच्छतेची जाणीव व्हावी. परिसर स्वच्छतेची मुख्य जबाबदारी संबंधित यंत्रणेची असली तरी आपणही आपली जबाबदारी पार पाडावी, या उद्देशाने दरवर्षी सिद्धेश्‍वरांच्या यात्रेनंतर होम मैदानावर स्वच्छतेचा जागर केला जातो. यंदा ‘सकाळ’च्या वतीने हा जागर रविवारी (ता. २९) केला जात आहे.

- अभय दिवाणजी

सोलापूर : ‘माझं सोलापूर, स्वच्छ सोलापूर... सुंदर सोलापूर, माझी जबाबदारी’ हे ब्रीद घेऊन सोलापुरातील नागरिकांना स्वच्छतेची जाणीव व्हावी. परिसर स्वच्छतेची मुख्य जबाबदारी संबंधित यंत्रणेची असली तरी आपणही आपली जबाबदारी पार पाडावी, या उद्देशाने दरवर्षी सिद्धेश्‍वरांच्या यात्रेनंतर होम मैदानावर स्वच्छतेचा जागर केला जातो. विविध सामाजिक संघटना, संस्थांचा मोठा सहभाग असतो. गेल्या दोन वर्षात यात खंड पडला असून यंदा ‘सकाळ’च्या वतीने हा जागर रविवारी (ता. २९) केला जात आहे.

गेल्या काही वर्षात स्मार्ट सोलापूरमध्ये स्वच्छतेबाबत बरीच सुधारणा झालेली दिसून येत आहे. ‘सकाळ’च्या वतीने वृक्षारोपण, स्वच्छतेचा जागर, नदी प्रदूषणविरोधी जागर, वटवृक्षाच्छादीत सोलापूर-अक्कलकोट मार्ग, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे सक्षमीकरण, जलसंधारण, प्रदूषणमुक्त संभाजी तलाव मोहीम, वाहतूक जागर, माझी उजनी कृतज्ञता अभियान, अतिक्रमण हटाव... हरितपट्टा तयार करा मोहीम, विद्यार्थिनींसाठी सायकल उपक्रम असे अनेक उपक्रम सांगता येतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त सोलापूर व परिसरात १२५ रोपे लावून त्याचे संगोपन करण्यात आले आहे. अशा विविध योजनांद्वारे ‘सकाळ’ने कृतीयुक्त उपक्रम राबविले आहेत.

लोकशाहीत लोकसहभाग महत्त्वाचा... तद्वतच ‘सकाळ’च्या प्रत्येक उपक्रमात लोकसहभाग घेतला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे सक्षमीकरण हा गेल्या काही वर्षातील ‘सकाळ’चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यासाठी दिशादायक ठरलेला आहे. मोहोळमध्ये पेरू विक्रेत्या महिलेनेही आपल्या उत्पन्नातील दोनशे रुपयांचा वाटा शाळांच्या रंगरंगोटीसाठी दिल्याचे उदाहरण आहे. त्यामुळे या पालकांना जिल्हा परिषदेची नव्हे तर ती आपली शाळा आहे, असे वाटू लागले आहे. हा बदल करण्यात ‘सकाळ’ने मोठा वाटा उचलला आहे, अशी अनेक उदाहरणे देता येतील.

स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात सोलापूरचे नाव येण्यासाठी ‘सकाळ’ने सातत्याने केलेला पाठपुरावा सोलापूरकरांना स्मरत आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात देशात नववा व राज्यात दुसरा क्रमांक पटकावून सोलापूरने आपली मान उंचावली. त्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचे मोठे काम ‘सकाळ’ने केले. सोलापूरच्या सर्वांगिण विकासासाठी सकारात्मक पत्रकारिता करताना ‘सकाळ’च्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरु असतो. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या पंधरा वर्षांपासून होम मैदानावर सिद्धेश्‍वर यात्रेनंतर स्वच्छतेचा जागर केला जातो. या माध्यमातून आरोग्याचाही जागर करण्यात येतो.

जलयुक्त शिवारच्या कामांमुळे सोलापूर जिल्ह्यातील ५१ गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करण्याचे काम नजरेत भरण्यासारखे झाले आहे. उजनी, एकरुख (हिप्परगा), बोरी (कुरनूर) येथील धरण परिसरात पर्यटनाद्वारे विकास व्हावा, यासाठीही पाठपुरावा सुरु आहे. रोजगाराच्या संधी, उद्योजकांना पाठबळ, स्थानिकांच्या व्यवसायात वृद्धीसाठीही ‘सकाळ’ने वेळोवेळी लेखणी झिजवली आहे.

दोन वर्षे महापालिकेचा पुरस्कार

सोलापूर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा घेतली होती. यामध्ये सहभाग नोंदवत ‘सकाळ’ने सामाजिक बांधिलकी जपली आहे. गणेशोत्सवाच्या काळातील पर्यावरणाचा जागर केल्याबद्दल ‘सकाळ’ला गेली सलग दोन वर्षे चार लाखांचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती; तेवढ्यात काळानं घात केला अन्..., २० वर्षीय लेकीनं जीव गमावला

Pune Thar Donkey Viral Video : पुणेकरांचा नादच खुळा!, चक्क लाखोंची 'THAR' गाढवं समोर बांधून भररस्त्यानं वाजवत, ओढत नेली शोरूमला

Video : हर हर महादेव! कैलाश पर्वत सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालं..सुर्योदयाचा चमत्कारिक व्हिडिओ व्हायरल, दिवसभरात 10 लाख Views

मानधन नाही तर 'या' कारणासाठी शैलेश लोढांनी सोडला तारक मेहता का उल्टा चष्मा; स्वतःच उघड केलं कारण !

Navi Mumbai: नवी मुंबईतील वाहतूक कोंडी सुटणार! सर्वात वर्दळीच्या 'या' ठिकाणी ब्रिज बांधणार, कधी आणि कुठे ? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT