Karmala political centre Adinath co operative sugar factory ready to be leased 
सोलापूर

करमाळ्याचा राजकीय केंद्रबिंदू आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची तयारी? 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍याचे अर्थकारण, राजकारण कायम श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या भोवती फिरत राहिले आहे. कारखान्याच्या मालकीची 200 एकर जमीन आणि कारखान्याच्या परिसरात लाखो मेट्रिक टन ऊस उपलब्ध असतानाही हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आदिनाथ कारखाना तालुक्‍याची अस्मिता आहे. तालुक्‍याची अस्मिता भाड्याने देणे सभासद मान्य करतील का? या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल. मात्र संचालक मंडळ कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देण्याच्या तयारीत असून तसा निर्णय 18 जुनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 
आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाला एकहाती सत्ता मिळवली. मात्र कारखान्यापुढे अडचणी वाढत असल्याचे कारण पुढे करत बागल गटावर नाराज होऊन विधानसभेच्या तोंडावर 8 संचालक बाहेर पडले. सध्या संचालक मंडळातील मतभेद उघड आहेत. मात्र सर्वच संचालकांना कारखाना चालला पाहिजे असे वाटते. करमाळा तालुक्‍यात साधारणपणे दरवर्षी 30 ते 35 लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन होते. आदिनाथला गाळप होणारा सर्व ऊस बैलगाडीने वाहतूक केला जाऊ शकतो. मात्र कारखाना व्यवस्थापनाने योग्य नियोजन न केल्याने करखान्याच्या परिसरातूनच बाहेर तालुक्‍यातील व जिल्ह्यातील अनेक कारखाने गाळपासाठी ऊस घेऊन जातात. गेल्यावर्षी तर कारखाना बंद ठेवावा लागला होता. आदिनाथ कारखाना व्यवस्थित न चालवता आल्याचा फटका विधानसभा निवडणुकीत रश्‍मी बागल यांना बसला आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्‍याच्या राजकारणाची घडी बसवण्यासाठी काहीही करून आदिनाथचा भोगा वाजवणे गरजेचे आहे. हा भोगा स्वतः वाजवाचा की दुसऱ्याच्या हातात द्यायचा हा निर्णय बाकी आहे. 
श्री आदिनाथ साखर कारखाना आर्थिक अडचणीत असून कोणतीही बॅंक कारखान्यास कर्ज देण्यास तयार नाही. कारखान्याकडे राज्य सहकारी बॅंकेचे कर्ज थकीत आहे. याविषयी ता. 18 जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. कारखाना सक्षम व्यक्ती किंवा कंपनीस भाडेतत्त्वावर चालवला देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. 
कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश कांबळे यांच्या हिवरवाडी येथील निवासस्थानी संचालक मंडळाची ही बैठक घेण्यात आली. कारखान्यांचे अध्यक्ष धनंजय डोंगरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बागल गटाच्या नेत्या व आदिनाथच्या संचालिका रश्‍मी बागल, मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल, आदिनाथचे उपाध्यक्ष रमेश कांबळे, माजी अध्यक्ष संतोष पाटील, संचालक नानासाहेब लोकरे, डॉ. हरिदास केवारे, चंद्रहास निमगिरे, नितीन जगदाळे, बापुराव देशमुख, प्रकाश झिंजाडे, सौ. केकाण, अविनाश वळेकर, अशिष गायकवाड, कार्यकारी संचालक अरूण बागनवर उपस्थित होते. 
दरम्यान, कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असला तरी सभासदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याला मान्यता घ्यावी लागणार आहे. 

बाहेरील व्यक्तीला देणार नाही 
आदिनाथ साखर कारखाना चालु करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. जर आम्हाला कारखाना चालु करता आला नाही तर भाडेतत्त्वावर चालवुन सभासदांच्या ऊसाचा प्रश्न सोडविण्याची आमची तयारी आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही तालुक्‍याबाहेरील व्यक्तीला कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला देऊ देणार नाही. 
- रमेश कांबळे, उपाध्यक्ष, श्री आदिनाथ कारखाना, शेलगाव-भाळवणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha: समृद्धीवर ट्रॅव्हल्स ट्रकवर मागून धडकली; मेहकरजवळील घटना; १५ जण गंभीर तर १२ जण किरकोळ जखमी

Karad Highway: कऱ्हाडमध्ये पहिल्याच पावसात महामार्गाची पोलखोल; गटार तुंबले, पाणी-चिखल रस्त्यावर, गटारावरील तुटलेली झाकणेही जीवघेणी

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांना धक्का! सलग 10 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ; 10 ग्रॅमचा नवा दर किती?

Pune News: महसूल विभागालाच चकवा! बनावट शासकीय आदेशांचे रॅकेट उघड; भूमाफियांमध्ये खळबळ, महसूल अभिलेखांत फेरफार

Latest Marathi News Update : रमेश केरे पाटील यांचे विखे पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT