Karmaveer
Karmaveer 
सोलापूर

कर्मवीरांच्या कार्याचे महात्मा गांधी यांनी केले होते कौतुक : प्रा. अजित पाटील 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उभारलेल्या शैक्षणिक कार्यात त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांचा मोलाचा वाटा होता. कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीसाठी अतोनात कष्ट केले. महात्मा जोतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत काम करताना त्यांना शैक्षणिक संस्था उभी करण्याची प्रेरणा मिळाली. सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, धाडस, चिकाटी, तळमळ, कष्ट सोसण्याची तयारी या बळावर त्यांनी बहुजन समाजाची सोय केली. महात्मा गांधी यांनी कर्मवीरांच्या कार्याचे कौतुक केले, असे प्रतिपादन विनोदी मराठी साहित्यिक प्रा. अजित पाटील यांनी केले. 

रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 133व्या जयंती समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक व रयतच्या मध्य विभागीय सल्लागार समितीचे कार्याध्यक्ष संजीव पाटील हे होते. 

प्रा. पाटील म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्वभाव हा बंडखोर होता. त्यांनी सत्य व प्रामाणिकपणा यांच्याशी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या व्यक्तिगत जीवनात आलेल्या संकटात त्यांनी हार मानली नाही. केवळ सहावी नापास असलेल्या अण्णांना डी.लिट. ही मानद पदवी शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याबद्दल मिळाली. 

अध्यक्षीय भाषणात संजीव पाटील म्हणाले, कर्मवीर अण्णांनी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये "रयत'ची निर्मिती केली, तशीच परिस्थिती सध्या कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी रयत प्रयत्न करत आहे. रयत विद्यापीठ करण्याचे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वप्न पहिले होते. ते स्वप्न लवकरच सत्यात उतरत आहे. 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक शिंदे यांनी प्रास्ताविक केले. हा कार्यक्रम झूम मीटद्वारे ऑनलाइन घेण्यात आला. कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य शिवाजीराव पाटील रोपळेकर, डॉ. राजेंद्र जाधव, मुख्याध्यापक संजय शेवाळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुभाष सोनवणे, अमरजीत पाटील, उपप्राचार्य डॉ. निंबराज तंटक, डॉ. लतिका बागल, प्रा. चंद्रकांत रासकर, अधिष्ठाता डॉ. तानाजी लोखंडे, कार्यालय प्रमुख अनंता जाधव आदी उपस्थित होते. डॉ. अमर कांबळे सूत्रसंचालन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तांत्रिक सहाय्य डॉ. रमेश शिंदे, डॉ. समाधान माने व प्रा. राजेंद्र मोरे यांनी सहाय्यक केले. विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिष्ठाता डॉ. सुखदेव शिंदे यांनी आभार मानले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT