Sapate_Kothe 
सोलापूर

सपाटे म्हणाले, कोठे महापालिकेतील भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू ! कोठे म्हणाले, सपाटेंनी बोलण्यासाठी कोणाकडून पैसे घेतले

तात्या लांडगे

सोलापूर : शिवसेनेतून राष्ट्रवादीत जाणारे कोठे यांचा आणखी पक्षात अधिकृत प्रवेश झाला नसतानाच राष्ट्रवादीचे नेते मनोहर सपाटे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. कोठे हे महापालिकेतील भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू असून त्यांनी स्वत:बरोबर अनेकांना भ्रष्टाचार शिकवल्याचा आरोपही सपाटे यांनी केला. तर कोठे म्हणाले, ज्यांना महापालिकेत निवडून येता आले नाही आणि विधानसभेला स्वत:चे डिपॉझिट वाचवू शकले नाहीत, त्यांना पाणीप्रश्‍न काय समजणार.

कोठे म्हणाले... 

  • विधानसभेला डिपॉझिटही वाचवू न शकलेल्या सपाटेंनी उत्तर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे अस्तित्व संपविले 
  • शहराचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर असतानाही सपाटेंना त्याचे काहीच गांभीर्य नाही; पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा सपाटेंचा प्रयत्न 
  • महापालिकेत निवडून येता आले नाही, अशा सपाटेंचा बोलविता धनी कोण? 
  • 2009 मध्ये पक्षाने उमेदवारी दिली नसतानाही सपाटेंनी अपक्ष निवडणूक लढविली; त्यावेळी अजितदादांनी त्यांना झापले 
  • सपाटे यांनी माझ्याविरोधात बोलण्यासाठी अथवा निवडणूक लढविण्यासाठी कोणाकडून किती पैसे घेतले हे जाहीर करावे 
  • भाजप नेत्याला मदत होईल, अशी भूमिका घेणाऱ्या सपाटेंनी स्वत: भाजपमध्ये गेल्याचे स्पष्ट करावे 

महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. मात्र, त्यांचा अधिकृत प्रवेश अजून झालेला नाही. तरीही आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे कोठे यांनी खूपवेळा स्पष्ट केले आहे. मात्र, माजी महापौर मनोहर सपाटे म्हणाले की, कोठे कधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तर कधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र यांची भेट घेतात. तर माजी केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी त्यांच्या ताब्यात 30 वर्षे महापालिका देऊनही त्यांनी त्यांच्याशी गद्दारी केली. शिवसेनेतही त्यांनी तसाच प्रकार केला. त्यामुळे कोठे हे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते स्वत:चा गट वाढवतील, मात्र पक्ष वाढविणार नाहीत. उलट ते पक्षाची वाटच लावतील, असेही सपाटे म्हणाले. तर कोठे म्हणाले, ज्यांनी महापालिकेत व उत्तर विधानसभा मतदारसंघात पक्षाची वाट लावली, त्यांनी पक्षवाढीच्या गप्पा करु नयेत. दरम्यान, पक्षांतर्गत वाढत असलेला वाद वरिष्ठ नेतेमंडळी कसा सोडवणार, याची उत्सुकता लागली आहे. 

सपाटे म्हणाले... 

  • माझ्या वॉर्डात पुतण्याला उमेदवारी देऊन कोठेंनी माझा पराभव केला 
  • भाजप नेत्यांच्या भेटी घेणाऱ्या आणि शिवसेना, कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या कोठेंनी पक्षनिष्ठा शिकवू नये 
  • शहरातील पाणीपुरवठ्यासाठी आतापर्यंत दोनशे कोटींचा खर्च; कामातील पैसे कोठेंनी वाटून घेतले 
  • 30 वर्षे सत्ता असतानाही कोठे यांना पाणीप्रश्‍न दिसला नाही; सभागृह नेता असताना मी हा विषय मांडला, तेव्हा त्यांनीच तो फेटाळला 
  • विधानसभा निवडणुकीत कोठेंनी भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे काम केले 
  • कोठेंच्या पराभवासाठी अथवा काही बोलण्यासाठी मी कोणाकडून पैसे घेतले कोठेंनी दाखवून दिल्यास राजकारणातून मी निवृत्ती घेईन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT