Theft
Theft Sakal
सोलापूर

Crime News : एकाच रात्रीमध्ये दहा ठिकाणी घरफोडी; चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद

वसंत कांबळे

कुर्डू (सोलापूर) - लऊळ, ता. माढा येथील गणेश विसर्जनाच्या पुर्व संध्येला अज्ञात चोरट्यांनी दहा ठिकाणी घरफोडी केली असुन, रोख रक्कम, चांदी, पैंजण जोड व गंठण चोरी केली आहे. बऱ्याच ठिकाणी काही न मिळाल्याने घरातील सामानाची तोडफोड केली आहे.

गावातील एका दवाखान्याच्या दरवाज्याचे लोखंडी ग्रील तोडत असताना सीसिटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. २८सप्टेंबर गुरुवारी पहाटे २.३० च्या ते पहाटे ४.०० वाजण्याच्या दरम्यान हे सर्व कृत्य अज्ञात चोरट्यांनी केले आहे.

पंचशील नगर येथील मुक्ताबाई लोंढे (वय-७८), रामभाऊ कोंडीबा जानराव (वय-५५), अण्णाभाऊ साठे नगर येथील सुनील आण्णा वाघमारे (वय-५०), दत्ता गजेंद्र शिंदे (वय-३४),नंदा कांबळे, नागन्नाथ कोंडीराम चांदणे (वय-४५), रोहीदास नगर मधील डॉ प्रविण चोपडे यांच्या माऊली क्लिनिक व डिकोळे गल्ली येथील संजय धर्मा डिकोळे (वय-४३), राजाराम दिगंबर डिकोळे (वय-५५), यांच्या घराची कटावणी ने कोयंडे काढून घरातील साहित्याची तोडफोड केली आहे.

अर्जुन रामा डिकोळे (वय-५०) यांच्या घरातील पैंजण जोड व गंठण, व रोख रक्कम एकुण एक लाखाच्या रकमेची चोरी झाली असल्याचे त्यांनी सकाळ प्रतिनीधीशी बोलताना सांगितले. पोलीसांनी चोरीच्या ठिकाणांची पाहणी केली असून तक्रार देण्यासाठी आवाहन केले आहे.

एकाच रात्रीमध्ये दहा ठिकाणी चोरट्यांनी बंद असलेली वृध्द व्यक्ती राहत असलेली व इतरांच्या घरांच्या कडी लावुन चोरी केल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतने गावठाण मध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. पण ज्यांनी चोरी झाली आहे त्या परिसरात कॅमेरे नाहीत. त्या ठिकाणी त्वरित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: आशिष शेलारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले महायुती मुंबईतील सर्व सहा जागा जिंकेल...

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT