ventilator bed
ventilator bed 
सोलापूर

करमाळ्यात नाही एकही व्हेंटिलेटर बेड ! रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन मिळणेही झाले मुश्‍कील

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयासह तीन खासगी दवाखान्यांत कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र करमाळा तालुक्‍यातील शासकीय रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात एकही व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था नाही. त्यामुळे कोरोना रुग्णास व्हेंटिलेटरची गरज लागल्यास बाहेर पाठवावे लागत आहे.

विशेष म्हणजे गेल्या चार दिवसांपासून करमाळ्यात कोठेही रेमडेसिव्हीरचे एकही इंजेक्‍शन मिळत नाही. त्यामुळे एकूणच करमाळ्यातील आरोग्य यंत्रणेची असलेली गंभीर परिस्थिती समोर आली आहे. आता तरी करमाळ्याच्या आरोग्य यंत्रणेविषयी सतर्क होण्याची वेळ आली आहे. 

करमाळ्यातील आरोग्य यंत्रणेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत आहे ती आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्णांवर उपचार करते आहे. मात्र ही यंत्रणा निश्‍चित पुरेशी नाही. करमाळ्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे मुलींच्या वसतिगृहात कोव्हिड केअर सेंटर सुरू आहे. येथे रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र येथील रुग्ण गंभीर होऊ लागल्यास पुढील उपचारासाठी शासकीय किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये हलवावे लागत आहे. कोरोनावरील उपचार गोरगरीब कुटुंबातील व्यक्तीला परवडत नाही. लाखोंच्या घरात होणारा खर्च परवडणारा नसल्याने सर्वसामान्य नागरिक हतबल झाले आहेत. 

करमाळा तालुक्‍यात व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था नसल्याने कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्याची गरज निर्माण झाल्यास सोलापूर, बार्शी, अकलूज, बारामती, पुणे, नगर येथे हलवावे लागत आहे. मात्र या ठिकाणी अचानक व्हेंटिलेटर बेड मिळत नाही. त्यामुळे करमाळ्यात व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. 

आतापर्यंत कोरोनामुळे करमाळा शहरात 17 व ग्रामीण भागात 53 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर 1.72 टक्के आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी करमाळ्यात व्हेंटिलेटर व रेमडेसिव्हीरची उपलब्धता होणे गरजेचे आहे. 

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात 10 ऑक्‍सिजन बेडची व्यवस्था आहे. सध्या येथे सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन सध्या उपलब्ध नसल्याने सरकारी व खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत आहेत. लवकरच रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन उपलब्ध होतील. 
- डॉ. अमोल डुकरे, 
अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, करमाळा 

करमाळ्यात कुठेही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे व्हेंटिलेटरची गरज निर्माण झाल्यास रुग्णांना पुढील उपचारासाठी बाहेर पाठवावे लागत आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्‍शनसाठी धावपळ करावी लागत आहे. 
- डॉ. रविकिरण पवार, 
करमाळा 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT