Leopard banana orchard
Leopard banana orchard sakal
सोलापूर

नाविंदगी ता.अक्कलकोट येथे केळीच्या बागेत बिबट्या

राजशेखर चौधरी

अक्कलकोट : नाविंदगी ता.अक्कलकोट येथील सचिन हिरेमठ यांच्या केळीच्या बागेत बिबट्या आढळल्याने परिसरातील शेतकरी बांधवात घबराट पसरली आहे.नाविंदगी ते गौडगाव या गावाच्या रस्त्यावर नाविंदगी पासून एक किलोमीटर अंतरावर सचिन हिरेमठ यांची शेती आहे.त्यांची एक एकर केळीची बाग आहे.नेहमीप्रमाणे ते आपल्या केळी बागेची पाहणी करण्यासाठी शेतात गेली.

farmers and forest guard

सहज आत जात असताना त्यांना बिबट्या दिसल्याने ते घाबरून पळाले दरम्यान त्यांनी प्रसंगावधान राखत फोनाफोनी करून वनअधिकारी कार्यालय सोलापूर येथे संपर्क साधून याची माहिती दिली.ही घटना वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली त्याने लोक त्या शेतीकडे गेले आणि शे दीडशे जणांचा जमाव त्या ठिकाणी जमला.आता साडेचार वाजेपर्यंत तरी बिबट्या माझ्या केळीच्या बागेतच आहे असे शेतकरी सचिन हिरेमठ यांनी सांगितले पण काही नागरिक म्हणतात की त्याच्या सोबत आणखी एक बिबट्या देखील असल्याचे इतर शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.पण त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. आज दुपारी साडे अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान हा बिबट्या मी स्वतः पाहिल्याचे हिरेमठ यांनी सांगितले.दरम्यान चार जणांचे वन खात्याचे कर्मचारी व पोलीस प्रशासन देखील त्या ठिकाणी दाखल झाले असून ते यावर कार्यवाही करीत आहेत.

farmers and forest guard

याठिकाणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हिरेमठ यांच्या शेतीस भेट देऊन पाहणी करून तेही नागरीकांसोबत अद्याप तिथेच आहेत. त्यांनी वन कर्मचारी यांच्याशी चर्चा केली आणि याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे सूचना केली.वनखात्यातील कर्मचाऱ्यांत रुकेश कांबळे,संदीप मेंगाळ,गंगाधर विभूते आदींसह रेस्क्यू टीमसुद्धा एक पुणे व दुसरा सोलापूर येथून सहभाग घेण्यासाठी निघाल्याचे रुकेश कांबळे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajkot TRP Game Zone Fire: सौराष्ट्रातील सर्वात मोठा गेम झोन 'डेथ झोन' कसा बनला? 2 एकरमध्ये पसरलेले, 20 हून अधिक खेळले जायचे

Railway News: मध्य रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक; ६९ मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द!

Cyclone Remal: 'रेमल' घेऊन येत आहे विनाश! जाणून घ्या कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल, मुसळधार पाऊस अन् वादळाचा इशारा...

Eng vs Pak : आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडपुढेही पाकिस्तान नतमस्तक; बटलरच्या संघाने बाबरच्या टीमला आणले रडकुंडी

T20 World Cup 2024 : कोहली-पांड्या टीम इंडियासोबत का गेले नाहीत अमेरिकेला? मोठे कारण आले समोर

SCROLL FOR NEXT