Trap 
सोलापूर

बिबट्याचा मुक्काम सलग तिसऱ्या दिवशी वांगी परिसरातच ! आठ दिवस शोधूनही वनविभागाला अपयशच 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात बिबट्याला अद्यापही जेरबंद करण्यात किंवा ठार मारण्यास वन विभागाला यश आले नाही. सलग तिसऱ्या दिवशीही बिबट्याचा मुक्काम वांगी परिसरात आहे. शुक्रवारी (ता. 11) बिटरगाव (वा) येथे बिबट्यावर तीन फायर करण्यात आले, मात्र बिबट्या चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. 

या भागात असलेल्या नरभक्षक बिबट्यास ठार मारण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. मात्र, ता. 4 डिसेंबरपासून अद्यापही या बिबट्यास ठार मारण्यात वन विभागाला यश आले नाही. शनिवारी (ता. 12) दिवसभर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी बिटरगाव (वा), सांगवी नं. 2 परिसरात तळ ठोकून होते. मात्र, सध्या बिबट्याचा मुक्काम भिवरवाडी, ढोकरी, वांगी परिसरात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

शुक्रवारी फायर केलेल्या ठिकाणावरून पाचशे ते सहाशे फूट अंतरावर श्री. बोरकर या शेतकऱ्याला सायंकाळी सहा वाजता ढोकरी, भिवरवाडी भागात बिबट्या दिसला. त्यांची कुत्री भुंकत होती. कुत्री का भुंकताहेत हे पाहिल्यानंतर बिबट्या असल्याचे दिसून आले. त्यानंतर वन विभागाची यंत्रणा येईपर्यंत तो पसार झाला. 

दरम्यान, वांगी नं. 1 येथील अण्णा घोगरे यांच्या शेतात बिबट्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आला असल्याचे समजले असून, या ठिकाणी रात्री वन विभागाची टीम दाखल झाली आहे. 

बिबट्याच्या शोधासाठी अशी आहे यंत्रणा 
21 पिंजरे, 3 ड्रोन कॅमेरे, 42 ट्रप कॅमेरे, 5 शार्प शूटर, बेशुद्ध करणारी 2 पथके, 1 श्‍वान पथक व 16 वन विभागाची पथके, राज्य राखीव दलाची एक तुकडी आणि ग्रामस्थ बिबट्याच्या शोधात आहेत. तरीही बिबट्या जेरबंद होत नाही किंवा त्याला ठार केले जात नाही. यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण कायम आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

Weather Update: दिवसा उन्हाचे चटके, रात्री बोचरा उकाडा; तापमान बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

Manchar News : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला ‘वसंतराव काणे आदर्श’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT