road safety Sakal
सोलापूर

अपघात होणार कमी! ‘ट्रायल’पूर्वी वाहनचालकांना रोडसेफ्टी व्हिडिओ पाहण्याचे बंधन

ब्लॅकस्पॉट असो वा अपघाती मृत्यूमध्ये सोलापूर जिल्हा राज्यातील टॉपटेन जिल्ह्यांमध्ये असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : वाहनाचा परवाना काढण्यापूर्वी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून संबंधित चालकाची ट्रायल घेतली जाते. परंतु, वाढते अपघात रोखण्यासाठी आता त्याच शिकाऊ वाहनचालकाला अर्ध्या तासाचा रोडसेफ्टीचा व्हिडिओ पाहणे बंधनकारक करण्यात आले आहे.सोलापूर शहर हद्दीत २१ अपघातप्रवण ठिकाणे आहेत. दरवर्षी सोलापूर शहर परिसरात सरासरी ५५ जणांचा अपघाती मृत्यू होतो. तर ग्रामीण भागात अपघाप्रवण ठिकाणांची संख्या (ब्लॅकस्पॉट) ३७ आहे. जानेवारी ते जुलै २०२२ या काळात सोलापूर ग्रामीण हद्दीत विशेषत: महामार्गांवर जवळपास सहाशे रस्ते अपघात झाले आहेत.

त्यात ३४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ब्लॅकस्पॉट असो वा अपघाती मृत्यूमध्ये सोलापूर जिल्हा राज्यातील टॉपटेन जिल्ह्यांमध्ये आहे. अनेकदा बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करूनही वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. परिवहन आयुक्तालयाने आता दंडाची रक्कम वाढविली, तरीपण काहीही फरक पडलेला नाही. विनाहेल्मेट दुचाकी तर सीटबेल्ट न घालता वाहन चालविणे, वाहनांचा अतिवेग, मद्यपान करुन वाहन चालविणे, विरुध्द दिशेने वाहन चालवणे आणि लेन कटिंग ही जीवघेण्या अपघाताची प्रमुख कारणे आहेत. त्यासंदर्भातील माहिती आता सेफ्टी व्हिडिओतून दाखविली जात आहे. दंडात्मक कारवाई करताना आता कोणी वाहतूक नियम मोडला तर ते वाहन जप्त करून संबंधित वाहनचालकाला तो व्हिडिओ दाखविला जाणार आहे.

व्हिडिओतील ठळक बाबी

घाट वळणात वाहनाचा वेग किती असावा, त्याठिकाणी वाहन कसे चालवावे

टोल नाकाजवळ आल्यानंतर वाहनाचा वेग किती असावा

वाहनाची निगा कशी राखावी, त्याचा फायदा काय होतो

रस्त्यावरून पादचारी किंवा शाळकरी मुले पायी जात असल्यास वाहन कसे चालवावे

लेन कटिंगसह अन्य नियम मोडल्यास अपघात कसा होतो, याची माहिती

अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

"शिकाऊ वाहनचालकाच्या ताब्यात प्रत्यक्ष वाहन देण्यापूर्वी ‘सिम्युलेटर’ प्रणालीवर त्यांना वाहन चालविण्याची प्रॅक्टिस करता येते. तशी सोय आरटीओ कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. चालक प्रबोधन कक्षदेखील सुरु करण्यात आला आहे. रस्ते अपघात रोखणे हाच त्यामागील प्रमुख हेतू आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT