logo 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील 21 कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची कारवाई 

प्रमोद बोडके

सोलापूर : खत वाटपासाठी शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीची अंमलबजावणी न करता ठराविक शेतकऱ्यांना प्रमाणापेक्षा जास्त खत विक्री करणे, खत विक्री करताना एकाच आधारकार्डवर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खताचे वाटप करणे यासह सह शासनाने ठरवून दिलेल्या खत वितरण व्यवस्थापनात कुचराई केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील 21 कृषी सेवा केंद्राचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला आहे. 15 कृषी सेवा केंद्र चालकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. खरिपातील खत वाटपात कृषी केंद्र चालकांनी ही कुचराई केली होती. 

परवाना निलंबित केलेल्या कृषी सेवा केंद्रामध्ये पंढरपूर तालुक्‍यातील इंडिया कृषी केंद्र, सोहम कृषी केंद्र, पांडुरंग कृषी सेवा केंद्र, कट्टे ट्रेडिंग कंपनी, आपला ग्रोमर सेंटर, विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र, गुरुदत्त कृषी उद्योग समूह, माढा तालुक्‍यातील शिवराज कृषी केंद्र, माळशिरस तालुक्‍यातील रणजीत कृषी सेवा केंद्र, विशाल कृषी सेवा केंद्र, नेमचंद फुलचंद कडे कृषी सेवा केंद्र, पिलीव विकास कार्यकारी सोसायटीचे कृषी सेवा केंद्र, शेतकरी कृषी सेवा केंद्र, महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, धायगुडे ऍग्रो एजन्सी, मंगळवेढा तालुक्‍यातील समृद्धी कृषी केंद्र, कट्टे अग्रो एजन्सी, श्री महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील वैशाली कृषी केंद्र, करमाळा तालुक्‍यातील एस. डी. दाभोडा कृषी सेवा केंद्र, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील श्री गणेश कृषी सेवा केंद्र यांचा समावेश आहे. या कृषी सेवा केंद्रा विरोधात दाखल झालेल्या तक्रारींवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत 21 दुकानांचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT