Madha Lok Sabha Esakal
सोलापूर

Madha Lok Sabha: माढ्यात भाजपला मोठा धक्का, धैर्यशील मोहिते पाटलांचं ठरलं? भाजप सदस्यत्वाचा दिला राजीनामा

Madha Lok Sabha: माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी केली त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

अंकिता खाणे (Ankita Khane)

माढा लोकसभा निवडणुकीची तयारी दौरे, सभा, प्रचार सुरु असताना पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार, असल्याची माहिती समोर आली आहे. माढ्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गेल्या धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी केली त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार, अशा चर्चा आहेत.

काल (गुरुवारी ता. ११) धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली घेतली. यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले. शरद पवार यांच्या भेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुरुवारी मध्यरात्रीच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

ऐन निवडणुकीच्या तंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाची मोठी डोकेदुखी होणार आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून माढा लोकसभा निवडणूक लढविण्याचे निश्‍चित केले होते. तसा त्यांनी प्रसार माध्यमातून प्रचार आणि प्रसारही केला होता. भाजपकडे अतिशय ताकदीने आपणास उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्नही केले. परंतु भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंग नाईक-निंबाळकर यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करून मोहिते पाटील यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

त्यामुळे मोहिते-पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी सुरू झाली. यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचे निशान फडकवले. त्यानंतर धैर्यशील आणि मोहिते-पाटील परिवारातील सर्व सदस्यांनी माढा लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT