Udhav Thakare.jpg
Udhav Thakare.jpg 
सोलापूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध वक्तव्य करणे भाजप नेत्याला पडले महागात : शिवसैनिकांनी दिला चोप 

भारत नागणे

पंढरपूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं पंढरपूर येथील भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर यांच्या चांगलच अंगाशी आले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे आज पंढरपुरात तीव्र पडसाद उमटले. 
वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत शिरीष कटेकर यांच्या अंगावर शिवसैनिकांनी अंगावर शाई टाकून तोंडाल काळे फासले. एवढ्यावरच शिवसैनिक थांबले नाहीतर भर चौकात आणून त्यांना चांगला चोपही दिला. या प्रकरामुळे पंढरपुरात भाजप-शिवसेनेत संघर्ष वाढण्याची शक्‍यता आहे. 

शुक्रवारी (ता.5) भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली येथील वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन केले होते. यावेळी भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा ऐकेरी भाषेत उल्लेख करत त्यांच्या कुटुंबा विषयी अक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याची व्हीडीओ क्‍लिप आज समाज माध्यमात व्हायरल झाली. त्यानंतर त्यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याचे पंढरपूर शहर व तालुक्‍यात तीव्र पडसादही उमटले. वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या भाजप नेत्याला भर रस्त्यावर ओढत आणून चोप ही दिला. अंगावर काळी शाई टाकून व तोंडाला काळे फासले तर काही कार्यकर्त्यांनी बांगड्याचा हार करून तो गळयात घालून अंगावर साडी टाकून घोषणा बाजी केली. मंदिर परिसरात झालेल्या घटनेमुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी मंदिरातील एक पोलिस अधिकारी तात्काळ धावून आल्याने या भाजप नेत्याची शिवसैनिकाच्या तावडीतून सुटका झाली. याप्रकरणी उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नव्हती. 

शिरीष कटेकरवर गुन्हा दाखल करावा 
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी अक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी कालच गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु पोलिसांनी याबाबत कोणतीच कारवाई केली नाही. म्हणून शिवसैनिकांनी त्या भाजप नेत्याला अद्दल घडवली आहे. पोलिसांनी आमची तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करावा, अशीम मागणी पंढरपूरचे शिवसेना शहराध्यक्ष रवी मुळे यांनी केली आहे


संपादन : अरविंद मोटे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT