prashant paricharak sakal
सोलापूर

Mangalwedha News : विधानसभा लढवण्याचे प्रशांत परिचारकांचे संकेत?

नव्या वर्षात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना मा. आमदार प्रशांत परिचारक यांनी दिल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या संकेत दिले.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - नव्या वर्षात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना मा. आमदार प्रशांत परिचारक यांनी दिल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या संकेत दिले.

नव्या वर्षातील पांडुरंग परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दिनदर्शिकाचे प्रकाशन मा. आ. प्रशांत परिचारक यांच्या मंगळवेढा येथील संपर्क करण्यात आले. याच वर्षात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक असल्यामुळे परिचारकांच्या घोषणेने महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी दामाजी कारखानेचे अध्यक्ष शिवानंद पाटील, रामकृष्ण नागणे, युन्नुश शेख, अजित जगताप, प्रविण खवतोडे, गौरीशंकर बुरुकुल, गौडाप्पा बिराजदार, भारत बेदरे, विजय बुरुकुल, तानाजी कांबळे, गोपाळ भगरे, दिगंबर भाकरे, कन्हैया हजारे, अशोक माळी, शिवाजी नागणे, हौसाप्पा शेवडे, आदी सह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिनदर्शिका प्रकाशानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी या तालुक्यातील प्रश्न अजूनही रखडले आहेत. मालक तुम्ही या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी दर सोमवारी वेळ द्या अशी मागणी केली, असता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे सोमवारच काय कायमस्वरूपी या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण तयार असून 2023 पर्यंत आपला करार होता.

आता आपण तुमच्या प्रश्नासाठी कायमच उपलब्ध राहणार असून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत परिचारक हे देखील विधानसभेचे दावेदार असल्याचे आता जवळपास स्पष्ट होत चालले आहे. त्यामुळे आगामी काळातील राजकीय हालचाली परिचारक यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

मंगळवेढा तालुक्यामध्ये परिचारकांचा विस्तार कमी होता. परंतु दामाजी कारखान्याच्या नेतृत्व शिवानंद पाटील यांची सत्ता आल्यामुळे तालुक्यात गट विस्तार करण्यास संधी मिळाली. त्यामुळे 2014 व 2019 ला झालेल्या निसटत्या पराभवातील मताधिक्य हे मंगळवेढ्यातून दामाजी कारखान्याच्या सत्तेमुळे भरून निघू शकते. अशा राजकीय अंदाज असल्यामुळे परिचारकांनी आपले राजकीय पत्ते खोल खोलण्यास सुरुवात केल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT