married  woman harassment
married woman harassment sakal
सोलापूर

सोलापूर : माहेरून पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - आंतरजातीय प्रेमविवाह झाल्यामुळे तुझ्या माहेरून काहीच वस्तू किंवा पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आता व्यवसायासाठी माहेरून दहा ते १५ लाख रुपये आण म्हणून पतीने २००७ पासून छळ केल्याची फिर्याद रेश्मा आप्पा झिपरे (रा. रेल्वे लाईन, ख्रिचन सोसायटी) यांनी सदर बझार पोलिसांत केली आहे. पती आप्पा सदाशिव झिपरे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

घटनेची हकीकत अशी, ४ जून २००७ रेश्मा यांचा विवाह सोलापुरातील आप्पा झिपरे याच्याशी झाला. त्यांनी एकमेकांच्या संमतीने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. त्यांचा संसार सुखाचा सुरु होता. पण, आप्पाला दारुचे व्यसन लागले आणि त्यांच्यात सारखी भांडणे सुरु झाली. पैशाच्या कारणातून आप्पाने वारंवार रेश्मा यांना त्रास दिला. १५ वर्षांपासून पतीचा त्रास सोसूनही त्याने छळ करणे बंद केले नाही. सततची शिवीगाळ व मारहाणीला कंटाळून रेश्मा यांनी अखेर पोलिस ठाणे गाठले. त्यावेळी त्यांनी आप्पाने दिलेल्या त्रासाचा पाढाच पोलिसांसमोर वाचला. दारू पिऊन येऊन पतीने रात्री-अपरात्री घरबाहेर अनेकदा काढले.

प्रेमविवाह झाल्याने विवाहात माहेरून सोने, पैसे, वस्तू काहीच मिळाले नसल्याने त्याने माहेरून पैसे आण म्हणून छळ सुरु केला. माहेरून पैसे आण, नाहीतर सोडचिठ्ठी दे म्हणून अनेकदा मारहाण केली. पैसे किंवा सोने नाही आणल्यास खल्लास करेन, अशी धमकीही त्याने दिली. दहा ते १५ लाख रुपये माहेरून आण, मगच तुला व्यवस्थित नांदवतो म्हणून त्याने शारीरिक व मानसिक छळ केला, असेही रेश्मा यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस नाईक आनंद कंचे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT