The Meeting of Agriculture Department under chairmanship of Bharane in Solapur district
The Meeting of Agriculture Department under chairmanship of Bharane in Solapur district 
सोलापूर

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! असं आहे अन्नधान्य उत्पन्नाचे उद्दीष्ट

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : खरीप हंगाम 2020 साठी सोलापूर जिल्ह्यात दोन लाख 82 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी दिली आहे.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली. त्या बैठकीत खरीप हंगाम नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले. त्यानुसार नियोजन करण्यात आल्याचे बिराजदार यांनी सांगितले. बिराजदार यांनी सांगितले की, खरीपाच्या पीक पेरणीच्या नियोजनाबरोबरच अन्नधान्य उत्पादनाचेही उद्दीष्टय निश्चित करण्यात आले आहे. तृणधान्याचे 56816 मेट्रीक टन कडधान्याचे 76955 मेट्रीक टन असे अन्नधान्याचे एकूण 133771 मेट्रीक टनाचे उत्पादनाचे उद्दीष्टय निश्चित करण्यात आले आहे. गळित धान्याचे 44511 मेट्रीक टन उत्पादनाचे उद्दीष्टय निश्चित करण्यात आले आहे. बिराजदार म्हणाले, 2015 मध्ये पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे आणि त्यावर्षी उजनी धरणातील पाणी पातळी खालावल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांनी 2016 च्या खरीप हंगामात ऊसाऐवजी तूर, उडीद, मका, सोयाबीनची पेरणी केली. पीक पध्दतीत झालेल्या बदलाचा शेतक-यांना फायदा झाला. तेव्हापासून खरीप हंगामात तूर, उडीद, मका आणि सोयाबीन खालील पेरणीत वाढ होत आहे. 2019- 20 मध्ये ऊसाखालील लागवडीचे सरासरी क्षेत्र 1,65,800 हेक्टर आहे. मात्र आतापर्यंत 62108 हेक्टर क्षेत्रावरच लागवड झाली आहे.

जमीन आरोग्य पत्रिका अभियान : यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पाच गावांची मॉडेल व्हिलेज म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यानुसार 55 गावांतील 53566 खातेदारांचे मृदा नमुने काढण्याचे नियोजन केले असल्याचेही श्री. बिराजदार यांनी सांगितले.
बियाणे नियोजन : खरीप हंगाम 2020 साली 31,973 क्विंटल बियाण्याचे नियोजन आहे. पैकी 1080 क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. उर्वरित बियाणे महाबीज आणि खासगी कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
रासायनिक खतांचे नियोजन : हंगामासाठी 2,11,390 मेट्रीक टन खतांचे आवंटन मंजूर आहे. पैकी एप्रिल महिन्यात 20655 मेट्रीक टन खत उपलब्ध झाले आहे. खरीप हंगाम 2019 मध्ये जिल्ह्यात 1,33,451 मेट्रीक टन विक्री झाली होती. जिल्ह्यात सर्वाधिक मागणी युरिया खताला असते, असे श्री. बिराजदार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: ९० वर्षांचे भाजप नेते राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT