Devendra Fadanvis Sakal
सोलापूर

Devendra Fadanvis : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक ; आमदारांनी दिली माहिती

पाणी उपलब्धता व गावे कमी करण्यावरून 2019 ची विधानसभा निवडणूक गाजली.

हुकूम मुलाणी ​

Devendra Fadanvis - गेली अनेक वर्ष राजकीय व्यासपीठावर तरंगत असलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना अंतिम टप्प्यात असून या योजनेच्या मंजुरी संदर्भात 5 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाललनात बैठक आयोजित करण्यात माहिती आ. समाधान आवताडे दिली.

2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तालुक्याच्या दक्षिण भागातील 35 गावाच्या पाणी प्रश्नावरून राजकीय रणकंदन झाले. त्यानंतर 2014 ला या योजनेला प्रशासकीय मंजुरी दिली. पाणी उपलब्धता व गावे कमी करण्यावरून 2019 ची विधानसभा निवडणूक गाजली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेचे सर्वेक्षण झाल्याचे सांगण्यात आले. परंतु योजना प्रत्यक्षात काही मार्गी लागली नाही पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही समाधान अवताडे यांना आमदार करा मी या योजनेला भले राज्यात सरकार नसले तरी केंद्रातून निधी उपलब्ध करतो असे स्वतः दिले होते.

समाधान आवताडे हे विजयी झाले. त्यानंतर त्यांनी या योजनेसाठी पाठपुरावा देखील केला. येथील अवताडे शुगर च्या कार्यक्रमांमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेबाबत पुनरुचार करत सुधारित दराप्रमाणे प्रशासकीय मान्यता देणार असल्याचे सांगितले होते.

या सर्व योजनेचे अडथळे व सुधारित प्रशासकीय मान्यता होऊन सध्या ही योजना अंतिम टप्प्यात असून 5 सप्टेंबरला मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे.

या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक मंजुरीची चक्रे आणखी गतिमान ना.फडणवीस यांच्या माध्यमातून झाली. या योजनेसाठी आ. आवताडे वेळोवेळी सोलापूर, पुणे व मुंबई या ठिकाणी संबंधित अधिकारी व पदाधिकारी समवेत बैठकी घेतल्या.

गेल्या काही महिन्यांपासून एल.एस. टी.सी कडे व इतर प्रशासकीय अडचणीमुळे अडकून पडलेल्या या योजनेला आ.आवताडे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सततच्या पाठपुराव्यामुळे या योजनेचा शासन दरबारी प्रस्ताव सादर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या योजनेसाठी 24 गावातील 11 हजार 820 हेक्टर वरून 17111 हेक्टर क्षेत्र झाले.नव्या सर्वेक्षणानुसार जवळपास 6 हजार हेक्टर क्षेत्र वाढले असल्याने दुष्काळी भागातील गावाना याचा फायदा होणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT