MLA Praniti Shinde
MLA Praniti Shinde Sakal
सोलापूर

MLA Praniti Shinde : तुम्ही पाठवलेले खासदार आरक्षण, महागाई, जीएसटी, दुध दरावर बोलले का?

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून तुम्ही दहा वर्षात दोन खासदार पाठवले, त्यांनी संसदेत महागाई, जीएसटी, दूध दर, आरक्षण या प्रश्नावर एकदा तर बोलले का? असा सवाल आ. प्रणिती शिंदे यांनी तालुक्यातील तळसंगी ते बोलताना व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज खोमनाळ, फटेवाडी, तळसंगी, डोणज, बोराळे, सिद्धापूर या भागाचा गाव भेट दौरा केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्या समवेतकार्याध्यक्ष अॅड. नंदकुमार पवार, धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रा. येताळा भगत, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, अर्जुनराव पाटील, सुरेश कोळेकर, पांडुरंग चौगुले, जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने, नंदा ओमने, क्रांती दत्तू, विष्णु शिंदे, शिवशंकर कवचाळे, अॅड. रविकरण कोळेकर, अजय आदाटे, मनोज माळी, बापू अवघडे, आयेशा शेख, सुनीता अवघडे, नाथा ऐवळे, अमोल मामाने, जयश्री कावचाळे, म्हांतेष पाटील, शिवाजी काळे, संजीव कवचाळे, सैफन शेख, चेतन पाटील, संगणा घोडके, कुमार धनवे, संदीप बाबर, प्रशांत सगेलकर, विष्णू भंडगे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. शिंदे म्हणाल्या की, मोदी लाटेत खासदार झालेल्यांनी 2014 ते 19 या काळात कोणतेही काम केले नाही. तरीही तुम्हाला खोटे बोलून तुमच्याकडून पुन्हा 2019 ते 24 या कालावधीत मते घेतली. पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. आणि आता पुन्हा खोटे बोलून मते मागण्यासाठी येत आहेत. परंतु आम्ही तुम्हाला वस्तुस्थिती सांगण्यासाठी आलो आहोत.

तुमच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी सरकार पाठीशी राहील असा विश्वास देत सरकारने महागाई वाढवत तीनशे रुपयेला मिळणारा सिलेंडरमध्ये चौपट वाढ करून ठेवली. दुध दर कमी केला. त्यावर दिले जाणारे अनुदान अद्याप दिले नाही.

शेतकऱ्यांनी भरलेल्या पिकाचा विमा अजून दिला नाही. शेतकऱ्याला मिळणाऱ्या खतावर जीएसटी लावली, पन्नास रुपयाच्या चपलीवर दीडशे रुपये जीएसटी लावणारे तुम्हाला दोन हजार रुपये मिळतात असे सांगून पुन्हा दिशाभूल करू लागल्याचे सांगितले. या दौऱ्यात अॅड. नंदकुमार पवार, प्रा. शिवाजीराव काळुंगे, प्रशांत साळे, पांडुरंग चौगुले, प्रा. येताळा भगत, अॅड. रविकिरण कोळेकर यांची भाषणे झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT