Praniti_Shinde 
सोलापूर

कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे म्हणाल्या, "रश्‍मी शुक्‍लांवर होणारे आरोप खोटे असतील तर आम्ही त्यांच्यासोबत..!'

विश्वभूषण लिमये

सोलापूर : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत नाजूक आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. या सत्ताधारी आणि विरोधकांच्या वादामध्ये आता कॉंग्रेसने उडी घेतली आहे. कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांच्या रश्‍मी शुक्‍ला यांच्याबद्दलच्या विधानामुळे राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, प्रणिती शिंदे यांना रश्‍मी शुक्‍ला यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी, "रश्‍मी शुक्‍ला यांच्यावर होणारे आरोप जर खोटे असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. मात्र या प्रकरणाची कारवाई अद्याप सुरू आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर यावर भाष्य करू', अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे. 

सोलापूरमध्ये पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमामध्ये आमदार प्रणिती शिंदे बोलत होत्या. सध्या महाराष्ट्रातील राजकारणात कळीचा ठरलेला मुद्दा आहे तो म्हणजे राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांच्या लीक झालेल्या अहवालाचा. त्यांचा अहवाल लीक झाला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्‍मी शुक्‍लांवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे संपूर्ण महाविकास आघाडी शुक्‍ला यांच्याविरोधात एकवटल्याचे पाहायला मिळाले होते. 

मात्र कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी रश्‍मी शुक्‍ला यांच्या पाठीशी उभे राहण्याचा मानस बोलून दाखवला की काय, अशी चर्चा त्यांच्या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

LPG दरात मोठी उलथापालथ; कोणाला मिळाला दिलासा, कोणाला नाही? घरगुती अन् व्यावसायिक सिलिंडरमध्ये मोठा फरक

Balbharati : बालभारतीकडून गणितातील चुका मान्य; ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; दुरुस्तीची ग्वाही

SCROLL FOR NEXT