lok sabha election 2024 sakal
सोलापूर

Lok Sabha Poll 2024 : पंढरपुरात पदाधिकाऱ्यांची बैठक; भाजपचे लोकसभा निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग - प्रशांत परिचारक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेसाठी अनेक विकास योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे जनतेत समाधानाची भावना आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pandharpur News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेसाठी अनेक विकास योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे जनतेत समाधानाची भावना आहे. त्या जोडीला भारतीय जनता पक्षाने गेल्या वर्षभरापासून आगामी लोकसभा निवडणुकीचे अतिशय मायक्रो प्लॅनिंग केले आहे.

त्यामुळे सहाजिकच भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे, असा विश्वास माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

श्री. परिचारक म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची अनेक कामे देशभरात करण्यात आली. विविध शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याशिवाय मंत्री, खासदार, आमदारांपासून ते बूथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना लोकांमध्ये जाऊन विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधण्यास सांगण्यात आले.

पदाधिकाऱ्यांना ग्रामीण भागात एक दिवस मुक्कामास रहायला सांगून तेथील लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. प्रत्येक कामाचे रिपोर्टींग करण्यात आले. या शिवाय सर्व्हे करण्यात आले. जनतेच्या भावना समजून घेण्यात आल्या. या सर्व कामाचा फायदा आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निश्चितच होणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पक्षश्रेष्ठी निर्णय घेईल प्रत्येक निवडणुकीवेळी अनेक जणांची निवडणूक लढविण्याची इच्छा असते. त्यात गैर काही नाही. पक्षाच्या निरीक्षकांनी आमच्यासह विविध पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडून त्यांची मते जाणून घेतली आहेत. माढा मतदार संघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

तथापि गेल्या अनेक महिन्यांपासून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी देखील उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ते देखील जनमत जाणून घेण्यासाठी फिरत आहेत. अशा परिस्थितीत काय भूमिका घ्यायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.

...तर मलाही ऑफर

निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या नावावर एकमत होईल अशी चर्चा होती या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. परिचारक म्हणाले, तशी चर्चा होती. मला सगळ्यांनी ऑफर पण दिली होती. पण मी उमेदवारी मागितलेली नाही. तुम्ही असाल तर आमचा विरोध नाही असे रामराजे, बबनदादा, संजयमामा यांच्यासह अनेकांनी मला सांगितले होते.

परंतु मी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली नाही. पक्षाने मागील विधानसभा निवडणुकीत आपल्याला थांबायला सांगितले तेव्हा आपण थांबलो होतो. तसे लोकसभा लढायला सांगितले असते तर लढलो असतो, असे श्री. परिचारक यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी युवा नेते प्रणव परिचारक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT