Rohit Pawar
Rohit Pawar 
सोलापूर

भाजपच्या राज्यातील नेत्यांनी व केंद्र सरकारने युवकांसाठी काय केले? आमदार रोहित पवारांचा सवाल 

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येणार आहेत. भाजपने बारा वर्षे या मतदारसंघात काहीच काम केले नाही. शिक्षकांचे प्रश्नही मांडले नाहीत. भाजप सरकारने पाच वर्षे सत्तेत असताना शिक्षण क्षेत्रासाठी एकही निर्णय घेतला नाही, असा टोला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. 

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार पवार यांची लिंगायत बोर्डिंग येथे सभा झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, अजिंक्‍य पाटील, गणेश पाटील, शरद लाड, निरंजन भूमकर, विक्रम सावळे, भाऊसाहेब आंधळकर, सुप्रिया गुंड, सुवर्णा शिवपुरे, अमोल आंधळकर, ऍड. हर्षवर्धन बोधले, विक्रांत पाटील आदी उपस्थित होते. 

आमदार रोहित पवार म्हणाले, की चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांचे प्रश्न कधीच मांडले नाहीत. महाविकास आघाडीचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड यांना प्रश्नांची जाण असून ते निश्‍चित चांगले कार्य करतील. त्यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. स्पर्धा परीक्षांबाबत लाड यांचे काम चांगले आहे. मुद्दे मांडणारे उमेदवार आमच्याकडे आहेत. भाजपच्या राज्यातील नेत्यांनी व केंद्र सरकारने युवकांसाठी काय केले, असा सवालही त्यांनी केला. 

भाजपने राज्यात सत्तेत असताना शिक्षण क्षेत्रातील एकही निर्णय घेतला नाही. कोरोना संसर्गामुळे राज्यात परिस्थिती गंभीर असताना महाविकास आघाडी शासनाने सुमारे 50 ते 70 हजार कोटी रुपयांचे विविध करार केले आहेत. केंद्र सरकारकडून मात्र राज्याला जीएसटीचा हक्काचा निधीही दिला जात नाही. महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार रोजगार, एक लाख नोकऱ्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. सरकार त्यांना ताकद देईल, असेही श्री. पवार म्हणाले. 

दरम्यान, माजी मंत्री दिलीप सोपल, प्रभाताई झाडबुके यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT