Raj thackeray eSakal
सोलापूर

Raj Thackeray In Solapur: पंतप्रधानांकडून भेदभाव होतोय...; राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर डागली तोफ

Raj Thackeray On PM Modi: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

कार्तिक पुजारी

Solapur News: विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील तोफ डागली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी गुजरात आणि उत्तर प्रदेशसाठी सर्वात जास्त निधी देण्यात आला आहे. हे योग्य नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

हा महाविकास आघाडी किंवा महायुती असा प्रश्न आहे. जे चूक आहे ते चूक आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्पोर्टसाठीचे सर्वाधिक बजेट गुजरात आणि यूपीला देण्यात आला आहे. पंतप्रधानांनी सर्व राज्यांना समान न्याय द्यायला हवा. त्यांनी सर्व राज्यांना समान पद्धतीने पाहिलं पाहिजे. उद्या ते गुजरातमध्ये ऑलिम्पिक आणू पाहात आहेत, सर्वात मोठं स्टेडियम बांधायचं आहे ते देखील गुजरातमध्ये, असं कसं करून चालेल, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली.

उद्या महाराष्ट्रातला पंतप्रधान झाला अन् त्याने सर्व महाराष्ट्रासाठी आणलं तरी देखील मी त्याच्यावर टीका करेन. कारण, पंतप्रधानांनी सर्व राज्यांना समान दृष्टीने पाहिलं पाहिजे. ही गोष्ट होताना दिसत नाही. मग यावर का आक्षेप घ्यायचा नाही. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणावं हे मी पाळतो, असं राज ठाकरे म्हणाले.

आमचा पक्ष आता जन्माला आला आहे. त्याला १८ वर्षे झाली आहेत. काँग्रेसची स्थिती बघा, त्यांनी ६५ वर्षे राज्य केलं. त्यांना ४४ वर यावं लागलं. तुम्ही आमचं काय घेऊन बसला आहात. पण, विधानसभेमध्ये वेगळं चित्र असेच. निश्चित तुम्हाला वेगळं चित्र दिसेल असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. महाराष्ट्रातील लोकांना सर्व सुविधा देण्याची क्षमता राज्यात आहेत. पण, बाहेरून लोक येतात त्यामुळे अडचणी निर्माण होतात. महाराष्ट्रातल्या नोकरीच्या जाहिराती यूपी-बिहारमध्ये येतात. मला काही देश तोडायचं नाही. पण, आधी राज्यातील तरुणांना रोजगार द्या. त्यानंतर काही उरलं तर दुसऱ्या राज्यातील लोकांना संधी द्या, अशी भूमिका राज ठाकरेंनी स्पष्ट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT