Accident News esakal
सोलापूर

Mohol Accident : मोटरसायकल व एसटी अपघात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू

मोटरसायकल व एसटी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला.

राजकुमार शहा

मोहोळ - मोटरसायकल व एस टी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शेटफळ- पंढरपूर या महामार्गावरील आष्टी ता मोहोळ गावच्या शिवारात सकाळी पावणे बारा वाजता झाला. भारत बाजी सुरवसे वय 65 रा नजीक पिंपरी ता मोहोळ असे मृत इसमाचे नाव आहे. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मृत भारत सुरवसे हे मोटरसायकल क्र एम एच 13 एल 5250 वरून पंढरपूरहुन शेटफळेच्या दिशेने येत होते, तर एस टी क्रमांक एम एच 14 बी टी 4575 ही बार्शीहून पंढरपूरकडे निघाली होती.

दोन्ही वाहने आष्टी शिवारातील एका हॉटेल जवळ येताच त्यांची समोरासमोर धडक झाली. धडक होताच भारत सुरवसे यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले व रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्याचवेळी त्या ठिकाणा हुन माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे हे निघाले होते.

त्यांनी ही घटना पाहताच रुग्णवाहिकेला फोन केला व उपचारासाठी सुरवसे यांना पंढरपूर येथील कॉटेज हॉस्पिटलला रवाना केले. डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच भारत सुरवसे यांना मृत घोषित केले. या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT