sakal
सोलापूर

मोहोळ: लोकअदालतमध्ये अडीच कोटीची विक्रमी तडजोड

शासनाने सुरू केलेल्या लोकअदालती सारख्या सामाजिक उपक्रमाचा नागरिक व पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आपसात असणारी गोडी कायम ठेवावी असे प्रतिपादन मोहोळ येथील दिवाणी न्यायाधीश आर एन गायकवाड यांनी केले

राजकुमार शहा

मोहोळ : शासनाने सुरू केलेल्या लोकअदालती सारख्या सामाजिक उपक्रमाचा नागरिक व पक्षकारांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आपसात असणारी गोडी कायम ठेवावी असे प्रतिपादन मोहोळ येथील दिवाणी न्यायाधीश आर एन गायकवाड यांनी केले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या निर्देशानुसार मोहोळ येथील न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी न्यायाधीश गायकवाड मार्गदर्शन करीत होते. यावेळी लोकअदालत तिची सुरुवात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आली, हा आदर्श नवीन पायंडा मोहोळ न्यायालयाने पडला.

यावेळी दिवाणी न्यायाधीश गायकवाड यांच्यासह न्यायाधीश पी आर कुलकर्णी, विस्ताराधिकारी कुंडलिक गावडे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, पॅनल विधीज्ञ एन व्ही कांबळे ,टी डी आगलावे, एस यु भंडारी,एस ०ही जानराव, एस पी कुलकर्णी,सहाय्यक अधीक्षक एन आय बागायत, विधी सेवेचे शिवकुमार आलूर उपस्थित होते.

यावेळी एकूण 716 न्यायालयीन खटले तडजोडीसाठी ठेवले होते . त्यापैकी 64 प्रलंबित प्रकरणांचा निकाल लावण्यात आला. एकूण 2 हजार 836 दाखल पूर्व प्रकरणां पैकी 287 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या लोकअदालती मधे एकूण दोन कोटी 48 लाख 80 हजार रुपये एवढ्या रकमेची तडजोड करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीते साठी रुपेश ऐतवारे, विधी स्वयंसेवक महेश शिंदे, अस्लम मुलानी, ग्रामसेवक, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT