solapur sakal
सोलापूर

मोहोळ तालुक्यात 65 हजार जनावरांचे लंपी च्या पार्श्वभूमीवर लसीकरण

मोहोळ तालुक्यात अद्यापावेतो लंपी चा प्रादुर्भाव झाला नाही.

राजकुमार शहा

मोहोळ : "लंपी" चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मोहोळ तालुका पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय विभागाने कंबर कसली असून गेल्या आठवड्या पासून तालुक्यातील 65 हजार जनावरांचे लसीकरण झाले आहे. मंगळवार ता 28 रोजी लसीकरणासाठी तालुक्याला 50 हजार लसीं च्या मात्रा उपलब्ध झाल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ प्रदीप नवरे यांनी दिली.

या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ रणवरे म्हणाले, मोहोळ तालुक्यात अद्यापावेतो लंपी चा प्रादुर्भाव झाला नाही. मात्र तो होऊच नये म्हणून डॉ रणवरे व तालुक्यातील त्यांच्या इतर सहकारी डॉक्टरांनी गेल्या आठवड्या पासून लसीकरण सुरू केले आहे. तालुक्यात एक लाख गायींची संख्या आहे. त्यापैकी 65 हजार गाईंचे व इतर जनावरांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण करण्यासाठी मात्र डॉक्टरांची संख्या कमी पडत आहे. वटवटे व जामगाव या परिसरात दोन जनावरांना लंपी सदृश्य रोगांची लक्षणे दिसू लागली होती मात्र त्या भागात तातडीने लसीकरण केल्याने प्रादुर्भाव टाळला आहे.

दरम्यान तालुक्यातील जनावरांच्या लसीकरणा साठी वरिष्ठाकडे 50 हजार लसीं ची मागणी केली होती ,ती मंगळवारी उपलब्ध झाल्याचे डॉ रणवरे यांनी सांगितले. सध्या मोहोळ तालुक्यातील पशुवैद्यकीय विभागाकडे डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत, त्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना तात्पुरत्या स्वरूपात नेमून त्यांना प्रति लस पाच रुपये कमिशन देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीकरणाच्या कामाला वेग येणार असून लंपी चा प्रादुर्भाव थांबणार आहे. उर्वरित सुमारे 35 हजार जनावरांचे लसीकरण लवकरच पूर्ण करणार असल्याचे डॉ रणवरे यांनी सांगितले. गावोगावी सध्या मोफत लसीकरण सुरू आहे प्रत्येकाच्या शेतात जाणे शक्य नाही, त्यासाठी शेतकऱ्यांनी जनावरे गावात आणून लसीकरणाला सहकार्य करण्याचे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT