home treatment of corona patients esakal
सोलापूर

लक्षणे नसलेले कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक! सोलापूर जिल्ह्यात ७ तालुक्यांच्या नागरी भागात रुग्ण नाही

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून सध्या पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक ४० रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे सहा ते आठ दिवसांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. सात तालुक्यातील नागरी भागात सध्या एकही रुग्ण नाही. तीव्र किंवा मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या खूपच कमी आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून सध्या पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक ४० रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे सहा ते आठ दिवसांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. सात तालुक्यातील नागरी भागात सध्या एकही रुग्ण नाही. तीव्र किंवा मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या खूपच कमी आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनंतर आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सोलापूर जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर होता. काही दिवस सोलापूर शहर कोरोनामुक्त राहिले. पण, आता मागील १८ ते २० दिवसांत तब्बल पावणेतीनशे रुग्ण वाढले आहेत. सध्या शहरात १४१ तर ग्रामीणमध्ये १०५ सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी (ता. ९) शहरात ३२ तर ग्रामीणमध्ये १६ नवीन रुग्ण वाढले आहेत. पण, दिलासादायक बाब म्हणजे शहरातील २८ तर ग्रामीणमधील १५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या अक्कलकोट, करमाळा, माळशिरस, मोहोळ, उत्तर सोलापूर, सांगोला व दक्षिण सोलापूर या तालुक्यातील नागरी भागात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. सद्यस्थितीत पंढरपूर तालुक्यात ४०, माढा २५, अक्कलकोट ९, माळशिरस तालुक्यात ८ सक्रिय रुग्ण आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. बहुतेक रुग्ण त्यांच्याच घरी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेऊन बरे होत आहेत.

जिल्ह्यात १.२० लाख डोस शिल्लक

जिल्ह्यातील १२ वर्षांवरील सर्वांनाच आता कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली जात आहे. पण, १५ ते १७ वयोगटातील तरुणांचा लसीकरणाला प्रतिसाद खूपच कमी आहे. दुसरीकडे संरक्षित डोस व दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने लस टोचायला येणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचे ६० हजार तर कोवॅक्सिन व कोर्बोवॅक्स लसीचे प्रत्येकी ३० हजार डोस शिल्लक असल्याची माहिती लसीकरणाचे जिल्हा समन्वयक डॉ. अनिरूध्द पिंपळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : वर्ध्यात भटक्या कुत्र्याचा हैदोस, दिवसभरात तब्बल १९ जणांना चावा

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT