सोलापूर

Mothers Day Special : स्वयंप्रेरणेतून आईने केले 35 वेळा रक्तदान

वेणुगोपाळ गाडी

नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांचा जीव वाचावा या उदात्त हेतूने सोलापुरात रक्तदात्यांनी स्वतःहून रक्तदानासाठी पुढाकार घेतला. हे पाहून स्मिता पाटील यांनाही आपणही रक्तदान करावे असे वाटले आणि त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा रक्तदान केले.

किल्लारी येथे झालेल्या भूकंप आपत्तीवेळी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने त्यावेळी सोलापुरात लोकांच्या रक्तदानासाठी रांगा लागल्या होत्या. ते पाहून माझी आई प्रेरित झाली आणि तिनेही रक्तदान (Blood donation) केले. त्याचे सातत्य कायम ठेवत तिने आजवर 35 वेळा रक्तदान (donated blood 35 times so far) केल्याचे स्मिता अशोक पाटील (Smita Patil) यांच्या कन्या अमृता कुलकर्णी (Amruta Kulkarni) सांगत होत्या. (mothers day special amrita kulkarni mother has donated blood 35 times so far)

स्मिता अशोक पाटील असे अमृता कुलकर्णी यांच्या आईचे नाव आहे. 30 सप्टेंबर 1993 रोजी किल्लारी येथे मोठा भूकंप झाला होता. यामध्ये शेकडो लोक मृत्यूमुखी पडले होते तसेच अनेक लोक जखमी झाले होते. या जखमींचा जीव वाचावा याकरिता सोलापुरात डॉ. हेडगेवारसह अनेक रक्तपेढ्यांठिकाणी नागरिकांच्या रक्तदानासाठी उत्स्फूर्तपणे रांगा लागल्या होत्या. नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या लोकांचा जीव वाचावा या उदात्त हेतूने सोलापुरात रक्तदात्यांनी स्वतःहून रक्तदानासाठी पुढाकार घेतला. हे पाहून स्मिता पाटील यांनाही आपणही रक्तदान करावे असे वाटले आणि त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा रक्तदान केले.

पहिल्यांदा रक्तदान करून न थांबता पाटील यांनी या ना त्या निमित्ताने रक्तदानाचे सातत्य ठेवले. एवढेच नव्हे आपल्या कुटुंबातील लोकांनाही त्यांनी रक्तदान करण्याकामी परावृत्त केले. 54 वर्षीय माझी आई हेडगेवार रक्तपेढी मधून नर्स म्हणून निवृत्त झाल्या आहेत. त्यांनी या रक्तपेढीत 25 वर्षे काम केले आहे.

समाजात जगत असताना प्रत्येकाची सामाजिक बांधिलकी असते. ही जाणीव ठेवून स्मिता पाटील यांनी भूकंप आपत्ती वेळी रक्तदान केले आणि इतरांनाही यासंदर्भात प्रेरणा दिली. रक्ताअभावी अनेक रुग्णांचा बळी जात असल्याची उदाहरणे आपण नेहमीच पाहतो. त्यामुळे रक्तदानाचे महत्त्व किती आहे हे अधोरेखित होते. एखाद्या रुग्णाचा जीव जर आपल्या रक्तदानाने वाचत असेल तर रक्तदान करणे हे सार्थकच ठरते, अशी तिची भावना आहे. सध्याच्या कोरोना आपत्तीमध्येदेखील रक्त, प्लेटलेट्‌स आदींची गरज भासू शकते. अशावेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी स्वतःहून रक्तदानासाठी पुढे येणे अपेक्षित आहे असा संदेश तीच्या कृतीतून मिळाला.

रक्तपेढीत काम करीत असल्याने माझी आई भल्या पहाटेच स्वयंपाक करून घर सोडायची. भूकंप आपत्तीच्या निमित्ताने तिने पहिल्यांदा रक्तदान केले व त्यानंतर त्याचे सातत्य कायम ठेवत इतरांनाही प्रेरणा दिली. रक्तदानाबाबत सामाजिक बांधिलकीच्या तिच्या कार्याची मुलगी म्हणून मला सार्थ अभिमान आहे.

- अमृता कुलकर्णी (स्मिता पाटील यांच्या कन्या)

(mothers day special amrita kulkarni mother has donated blood 35 times so far)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT