MSEDCL power supply Swabhimani Shetkari Sanghatana rasta roko solapur
MSEDCL power supply Swabhimani Shetkari Sanghatana rasta roko solapur sakal
सोलापूर

सोलापूर : दिवसातील वीजपुरवठ्यासाठी स्वाभिमानीचे रास्ता रोको

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : महावितरणने थकीत वीज बिलासाठी विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे तालुक्यातील शेतकय्रातून उद्रेक होऊ लागला.दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिवसा सलग दहा तास वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी पंढरपूर विजयपूर या महामार्गावर राष्ट्रीय रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधी घोषणा दिल्या.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अॅड राहुल घुले, शंकर संघशेट्टी, संतोष सोनगे आबा खांडेकर रोहित भोसले लक्ष्मण गायकवाड अर्जुन मुद्गुल प्रभूचंदन शिंदे रवी गोवे शंकर रवे अशोक खताळ राजू माळी कुमार सावंत बबलू सावंत दत्ता म्हेत्रे हरी घुले लाला घुले जयसिंग घुले आनंद घुले औदुंबर नेहरवे व शेतकरी बांधव उपस्थित होते.यावेळी बोलताना जिल्हा संघटक युवराज घुले म्हणाले की, 21 व्या शतकामध्ये विजेची मागणी जर सरकार मान्य करत नसेल तर या निर्दयी सरकारचे करायचे काय माझ्या शेतकऱ्याने दिवसाही शेतामध्ये राबायचे आणि पाणी देण्यासाठी रात्री आपल्या कुटुंबाला सोडून शेतीला पाणी देण्यासाठी जीवावर उदार होऊन शेतात जायचे एवढे कष्ट करून सुद्धा ऊस गेल्यानंतर उसाचे बिल त्याला वेळेवर मिळत नाही कोणत्याही मालाला भाव मिळेल याची शाश्वती नाही डाळिंब पीक विमा मिळण्यास पात्र असतानासुद्धा विमा कंपन्या शेतकऱ्यांना वगळत असतील तर हा किती मोठा अन्याय होत आहे. यापूर्वी तालुक्यातील शेतकऱ्या वर असलेले अन्यायाची परंपरा अजूनही सुरूच आहे एवढे कमी की काय म्हणून आता सरकारने वीज बिल भरा म्हणून शेतकऱ्याच्या वीज कनेक्शन खंडीत करण्याची मोहीम हाती घेतली.

संपूर्ण कुटुंब अंधारामध्ये झोपतय जनावरांना पाजायला सुद्धा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे अशा या निर्दयी सरकारने आता तरी जागे व्हावे सत्तेत यायच्या अगोदर विज बिल माफीची केलेली घोषणा पाळावी आमच्या मागणीची गंभीर दखल घ्यावी अन्यथा यापुढे शेतकऱ्याची पोर ऊर्जा मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरने देखील मुश्किल करतील असे यावेळी बोलताना सांगितले.

विकत वीज घेऊन शेतीच परवडू शकत नाही तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी जशी शेतीला मोफत वीज दिली आहे तसेच या प्रगत महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची जाणीव कळवळा असेल तर मुख्यमंत्र्यांनी मोफत विजेची घोषणा करावी व शेतकऱ्याचा दुवा घ्यावा.

- श्रीमंत केदार तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT