पोलिस बंदोबस्तात तोडणार सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे वीज कनेक्‍शन esakal
सोलापूर

पोलिस बंदोबस्तात तोडणार सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे वीज कनेक्‍शन

पोलिस बंदोबस्तात तोडणार सिद्धेश्‍वर साखर कारखान्याचे वीज कनेक्‍शन

तात्या लांडगे

श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याने को-जनरेशनची चिमणी उभारताना ना प्रदूषण नियंत्रण मंडळाची ना पर्यावरण विभागाची परवानगी घेतली.

सोलापूर : श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याने (Siddheshwar Sugar Factory) को-जनरेशनची चिमणी उभारताना ना प्रदूषण नियंत्रण मंडळाची (Pollution Control Board) ना पर्यावरण विभागाची (Department of Environment) परवानगी घेतली. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे (Nitin Shinde) यांनी कारखान्याला 96 तासांची मुदत देत कारखाना बंद करण्याचे पत्र पाठविले. तर दुसरीकडे, महावितरण (MSEDCL) व जलसंपदा विभागालाही (Department of Water Resources) पत्र पाठवून 96 तासांची मुदत देऊन पाणी व वीज बंद करण्याचे आदेश दिले. त्याची मुदत आज (शनिवारी) संपणार आहे. जलसंपदा विभागाने पाणी बंद केल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनीही कारखान्यावर जाऊन कनेक्‍शन तोडण्याच्या दृष्टीने आज पाहणी केली आहे. दुपारी चार वाजता वीज कनेक्‍शन तोडले जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे (Chandrakant Dighe) यांनी दिली.

कारखान्याचा गाळप हंगाम सध्या सुरू आहे. महापालिकेने सुरू केलेल्या चिमणी पाडकामाची कार्यवाही थांबवावी, यासाठी कारखान्याने 30 ऑक्‍टोबर तर नोव्हेंबर महिन्यात दुसरी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. दोन्ही याचिका वेगवेगळ्या न्यायमूर्तींकडे असल्याने त्या एकत्रित करून त्यावर सुनावणी व्हावी, अशी मागणी कारखान्याच्या वकिलांनी केली होती. त्यावेळी महापालिकेच्या वकिलांनीही चिमणी पाडकामासाठी किमान दोन आठवड्यांची वेळ लागेल, असे स्पष्ट केले होते. त्यावर आता पुढील आठवड्यात सुनावणी होईल. तत्पूर्वी, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीनंतर नवा पेच कारखान्यासमोर निर्माण झाला आहे. चिमणी पाडकामापूर्वी ती थंड होऊ द्यावी लागणार आहे. तसेच को-जनरेशनची चिमणी उभारताना पर्यावरण विभागाची परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवून कारखान्याचे वीज कनेक्‍शन व पाणी बंद करण्याची कारवाई केली जात आहे. वीज कनेक्‍शन तोडण्याची कारवाई करताना महावितरणने पोलिस बंदोबस्त मागविला आहे. आता 4 वाजता महावितरण वीज कनेक्‍शन तोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महावितरणचे अधिकारी म्हणाले...

  • प्रदूषण नियंत्रण मंडळाने हरित लवादाच्या आदेशानुसार कारखान्याचे वीज कनेक्‍शन कपातीचे दिले पत्र

  • श्री सिद्धेश्‍वर साखर कारखान्याला दिलेली 96 तासांची मुदत आज संपणार

  • आज (शनिवारी) दुपारी चार वाजता कारखान्याचे तोडणार वीज कनेक्‍शन

  • वीज कनेक्‍शन तोडण्याची कारवाई करण्यासाठी मागितला पोलिस बंदोबस्त

  • वीज कनेक्‍शन तोडण्यासाठी जवळपास 20 पोलिस कर्मचाऱ्यांसह जाणार महावितरणचे सात कर्मचारी

  • जलसंपदा विभागाने बंद केले कारखान्याचे पाणी; महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केली कारखान्याची पाहणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT