3002Child_Mask_0_2.jpg
3002Child_Mask_0_2.jpg 
सोलापूर

नगरसेविकेला लस दिल्याप्रकरणी तिघांना घरचा रस्ता ! दोन्ही उपायुक्‍तांच्या विनंतीनंतरही आयुक्‍तांची कारवाई

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांना वरिष्ठांच्या परवानगीशिवाय लस दिल्याप्रकरणी आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी डफरीन हॉस्पिटलमधील तिघांना घरचा रस्ता दाखविला आहे, तर आरोग्याधिकारी डॉ. बिरूदेव दुधभाते आणि डाटा ऑपरेटर सुरज कारंडे यांना एकूण पगाराच्या 10 टक्‍के दंड करण्यात आला आहे. दोन्ही उपायुक्‍तांनी विनंती करूनही आयुक्‍तांनी ही कारवाई केल्याची चर्चा आहे.

सुट्टी दिवशीही काम करणाऱ्यांची चूक होती का?
शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, लसीकरणासाठी नागरिकांची संख्या वाढावी, या हेतूने आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी सुट्टीदिवशीही काम करीत आहेत. फ्रंटलाईनवरील सर्वच कर्मचाऱ्यांना वयाची अट न ठेवताच लस टोचल्याने नगरसेविका फुलारी यांनीही त्यांच्या मर्जीने लस घेतली. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना समज देऊन दंडात्मक कारवाई करण्याची मागणी दोन्ही उपायुक्‍तांनी केल्याची चर्चा आहे. मात्र, आयुक्‍तांनी स्वत:वर काही येणार नाही, याची खबरदारी घेत रात्रंदिवस काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याचे बोलले जात असून त्या कारवाईमुळे नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 45 ते 60 वयोगटातील को-मॉर्बिड रुग्णांना आणि 60 वर्षांवरील सर्वच ज्येष्ठ नागरिकांना लस टोचली जात आहे. त्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागासह राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नियमावली ठरवून दिली आहे. मात्र, डफरीन हॉस्पिटलमध्ये लसीकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याच्या हेतूने लस टोचून घेतली. त्यावेळी त्यांनी आधारकार्ड न देता आणि त्यांना दिलेल्या लशीची नोंद न करताच लस टोचून घेतली. त्यानंतर वरिष्ठांना त्याचे उत्तर द्यावे लागेल, आपल्यावर वरिष्ठांकडून जाब विचारला जाऊ शकतो, याची चिंतेतून आयुक्‍तांनी डफरीन हॉस्पिटलमधील चारजणांना तर आरोग्याधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली. सर्वांनी त्यांचे लेखी म्हणणे सादर केल्यानंतर आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी मेडिकल अधिकारी डॉ. फिरोज मुलाणी, आरोग्यसेविका अनुराधा लोहार व योगिता जाधव यांची हाकलपट्टी केली. तर आरोग्याधिकाऱ्यासह डाटा ऑपरेटर यांना त्यांच्या पगारातून 10 टक्‍के दंडाची रक्‍कम कपातीची कारवाई केली. तत्पूर्वी, उपायुक्‍त धनराज पांडे, जमीर लेंगरेकर यांनी आयुक्‍तांना कारवाई करू नये, अशी विनंती केली. तरीही आयुक्‍तांनी संबंधितांवर कारवाई केल्याचे बोलले जात आहे. आयुक्‍तांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT