2corona_agencies_1.jpg
2corona_agencies_1.jpg 
सोलापूर

माझे कुटूंब माझी जबाबदारी कागदावरच ! शहरात आज 'येथे' सापडले 53 पॉझिटिव्ह अन्‌ तिघांचा मृत्यू

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नसतानाही महापालिका प्रशासनाकडून टेस्टिंगचे प्रमाण वाढलेले नाही. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचनांकडे पूर्णपणे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. आज शहरातील 485 संशयितांची टेस्ट झाली असून त्यात 53 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एमआयडीसी रोड परिसरातील 56 वर्षीय पुरुषाचा, मुरारजी पेठेतील 65 वर्षीय महिलेचा, मौलाली चौकातील 66 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दुसरीकडे कोरोनाच्या महामारीत कुटूंब सुरक्षित राहावे, या हेतूने सुरु केलेल्या 'कुटूंब माझी जबाबदारी' या उपक्रमाचे नियोजनही महापालिकेचे कागदावरच झाल्याचे चित्र आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील 76 हजार 284 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरातील आठ हजार सहा जणांना झाला कोरोना 
  • शहरात आज 53 पॉझिटिव्ह तर तिघांचा झाला कोरोनाने मृत्यू 
  • आतापर्यंत सहा हजार 589 रुग्णांची कोरोनावर मात; 954 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 
  • शहरातील एकूण 463 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 

शहरात आज ओम गर्जना चौक, न्यू तिऱ्हेगाव (फॉरेस्ट), पूर्व मंगळवार पेठ, दक्षिण कसबा, लक्ष्मी पेठ, वैष्णवी नगर (सैफूल), दमाणी नगर, न्यू पाच्छा पेठ (अशोक चौक), महापौर बंगल्याजवळ, उमा नगरी, मड्डी वस्ती (भवानी पेठ), अमोल नगर (जुळे सोलापूर), गरिबी हटवा झोपडपट्टी क्र. एक, राघवेंद्र नगर, नरेंद्र नगर (विजयपूर रोड), गांधी नगर (अक्‍कलकोट रोड), मुरारजी पेठ, वसंत विहार (जुना पुना नाका), हुच्चेश्‍वर नगर भाग क्र. तीन, गणेश अपार्टमेंट (गीता नगर), ग्लोबल अर्पाटमेंट (शिमला नगर), देव नगर (सोरेगाव), उमा को- ऑप हौसिंग सोसायटी (मुरारजी पेठ), म्हाडा कॉलनी (वामन नगर), ब्रह्मचैतन्य नगर, भाग्यश्री नगर (नवीन आरटीओजवळ), करुणा हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), सायली अपार्टमेंट (होटगी रोड), केशव नगर पोलिस लाईन, काडादी नगर, मल्लिकार्जुन नगर, लक्ष्मी बॅंकेजवळ, कल्याणी टॉवर (सिध्देश्‍वर पेठ), वानकर वस्ती आणि गणेश नगर (हैदराबाद रोड) याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये हत्तीच्या हल्ल्यात मल्याळम वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार

SCROLL FOR NEXT