Sharad Pawar Visit To Solapur esakal
सोलापूर

NCP Crisis : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार सोलापूर दौऱ्यावर? 'त्या' तीन आमदारांविरुध्द आखणार रणनीती

सोलापूर जिल्ह्यातून तीन आमदारांनी शरद पवार यांची साथ सोडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

या दौऱ्यात शरद पवार काय भूमिका घेतात? जिल्ह्यातील कोणत्या प्रस्थापितांच्या विरोधात कोणाला ताकद देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्हा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे अतूट नाते आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कधी नव्हे ते सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील राष्ट्रवादीची पुनर्बांधणी करण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर कधी येणार? याकडे शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या मतदार संघात जाऊन सभा घेणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघापासून पवार यांनी दौऱ्याला सुरवात केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये शरद पवार यांचा सोलापूर दौरा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तत्पूर्वी पक्षीय स्तरावरील एक दौरा होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात शरद पवार काय भूमिका घेतात? जिल्ह्यातील कोणत्या प्रस्थापितांच्या विरोधात कोणाला ताकद देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागी कोणाला संधी मिळते? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT