ncp sharad pawar visit solapur to strengthen political party Esakal
सोलापूर

Solapur News : पवारांचा चौथा दौरा पक्ष उभारणीला फायदेशीर ठरणार का ?

आजच्या मंगळवेढा दौऱ्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षरित्या पवारांनाच पाणी प्रश्नावरून डिवचले.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा या मतदारसंघात तब्बल चौथ्यांदा दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस उभारी घेणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यातून विचारला जात आहे.

शरद पवार बोले आणि मंगळवेढा हाले अशी एकंदरी यापूर्वीचे राजकीय परिस्थिती परिस्थिती होती. मात्र 2009 साली रिडालोस मधून भारत बालके विजयी झाल्यानंतर तीन वेगवेगळ्या पक्षातून भालके आमदार राहिले परंतु पोटनिवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला ताब्यात ठेवण्यात अपयश आले.

त्यानंतर ही जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नेटाने प्रयत्न केले जात आहेत मात्र या मतदारसंघात पक्ष उभारी घेताना दिसत नाही. विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी शरद पवार यांचा पंढरपूर दौरा झाला.

मरवडे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे लतीफ तांबोळी यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यानिमित्ताने हजेरी लावत कार्यकर्त्यावर आपले लक्ष असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न झाला. गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने जात असताना मंगळवेढ्यातील कार्यकर्त्याला ऊर्जा दिली त्यानंतर आता शिवाजीराव काळुंगे यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार चौथ्यांदा या मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत.

या दौऱ्या दरम्यान त्यांचे दिवसभरात पाच ते सहा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सध्या असलेले पदाधिकारी अजून काही नेत्यांच्या भेटी टाळत असल्याचे चित्र सध्या आहे यावरून अंतर्गत धुसफूस असल्याचे स्पष्ट होत आहे मात्र या कार्यक्रमाच्या नियोजनातून पक्षबांधणी करण्याची संधी त्यांना मिळणार असली तरी त्यानंतर हा पक्ष पुन्हा उभारी घेणार का ?

असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे. पदवीधर मतदारसंघात निवडून दिलेले आमदार या मतदारसंघात प्रभावीपणे काम करत नसल्याची तक्रार दबक्यात आवाजात राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांनी केली त्यामुळे सध्या राष्ट्रवादीतून भगीरथ भालके बाजूला गेले आहेत ते सध्या भविष्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार होऊ शकतील अशी चर्चा या मतदारसंघात आहे.

त्यामुळे या मतदारसंघात अध्यक्ष पवार पक्ष बांधणी करण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्याला कोणता सल्ला देतात हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. कारण या मतदारसंघात सध्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना, दुष्काळ मधून तालुक्याला वगळणे,

मनरेगातून विहीर मंजुरी, दोन महिन्यात होणारी चारा टंचाई, आरोग्य व शिक्षण खात्यातील रिक्त पदे यासह अनेक प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठोस जन आंदोलन किंवा जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होताना दिसत नाहीत.

पवाराच्या जवळ असणारे कार्यकर्ते हे पवारांच्या दौऱ्यानंतर लोकात सक्रिय होत नाहीत त्यामुळे या दौऱ्यानंतर फल निष्पत्ती होणार का ? अशी देखील चर्चा सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यातून विचारले जात आहे. आजच्या मंगळवेढा दौऱ्यात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षरित्या पवारांनाच पाणी प्रश्नावरून डिवचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेंबूरमध्ये भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ८व्या मजल्यावरून कोसळले ६ मजूर

BEST Bus: मुंबईकरांसाठी दिलासा! BEST बससेवेत मोठे बदल; काही रूट बंद, काही वळवले, वाचा नवीन मार्गांची यादी

Latest Marathi News Live Update : इस्रायलचा इराणच्या अनेक भागात हल्ला

Kolhapur CNG Hydro : हायड्रो टेस्टिंग दरात चार ते पाचपट वाढ; रिक्षाचालक संघटनांचा तीव्र विरोध

Pune Road Accident : बाप-लेकाचा तो प्रवास ठरला शेवटचा! कात्रजमध्ये ट्रकने तीन वर्षांच्या चिमुकल्याला चिरडले; डोक्यावरून चाक गेल्याने जागीच अंत!

SCROLL FOR NEXT