

Afghanistan New Test & ODI Captain
Sakal
Afghanistan Appoint New Test & ODI Captain & Vice Captain: अफगाणिस्तानने काही दिवसांपूर्वीच भारताचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांना एकमेव कसोटी सामन्यात पराभवाचा धक्का बसला होता, तसेच वनडे मालिकेतही भारताने अफगाणिस्तानला पराभूत केलं होतं.
त्यानंतर मात्र अफगाणिस्तान संघात मोठा नेतृत्व बदल झाला आहे. हशमतुल्ला शाहिदीने (Hashmatullah Shahidi) संघाचे वनडे कर्णधारपद सोडले होते. तो २०२२ पासून ही जबाबदारी सांभाळत होता. त्याने कर्णधारपद सोडल्यानंतर आता अफगाणिस्तानने बुधवारी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.