दररोज कमीत कमी १५ ते ३० मिनिट ध्यान करा. यामुळे तणाव दूर होण्यास मदत होते आणि मेंदू स्वस्थ राहतो.
दररोज कमीत कमी १५ ते ३० मिनिट ध्यान करा. यामुळे तणाव दूर होण्यास मदत होते आणि मेंदू स्वस्थ राहतो. sakal
सोलापूर

ना मूर्ती ना प्रतीक फक्त ध्यान! सहजमार्ग ध्यान साधनेतून मिळते आध्यात्मिक ऊर्जा; सोलापूरमध्ये दर रविवारी शेकडो साधक करतात साधना

अरविंद मोटे

सोलापूर : सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळजीमुळे होतात. सर्व मानसिक काळजी बौद्धिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौद्धिक परिपक्वता ही आध्यात्मिक ऊर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याने येते. ध्यान करून साधकांना भरपूर आध्यात्मिक ऊर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते.

श्री रामचंद्र मिशन संचलित कान्हा शांतीवनम, हैदराबाद येथे सहज मार्गाचे जागतिक ध्यान केंद्र आहे गुरुदेव श्री. कमलेशजी पटेल हे या संस्थेचे प्रमुख आहेत. सहजमार्ग ही आध्यात्मिक संस्था ह्रदयावर ध्यान प्रक्रिया शिकवते. ईश्वरास हृयात शोधण्यास मदत करते.

जगभरात जवळपास १६५ देशामध्ये कार्यरत आहे. १९४५ पासून आजपर्यंत विनामूल्य सेवा देत आहे. देशात असंख्य लोक (अभ्यासी) आहेत. अनेक ठिकाणी आश्रम व प्रशिक्षक आहेत. सोलापूरला अक्कलकोट रोडवरील इस्कॉन मंदिरजवळ हा आश्रम आहे.

प्रत्येक रविवारी सकाळी ७ वा. ध्यान करता येते. ध्यानामुळे हृदय शांत होते. विचार स्थिर व शांत होऊन एकाग्रता वाढते. रक्तदाब व मधुमेह नैसर्गिक राहतो. ताणतणाव, चिडचिडेपणा कमी होतो. मन आनंदी राहते.

ना मूर्ती ना प्रतीक फक्त ध्यान...

सहज मार्ग या आध्यात्मिक संस्थेकडून ध्यान करून घेतले जाते. यामध्ये प्रशिक्षक नविन अभ्यास साधकाला ‘सीटींग’ देऊन प्रशिक्षण देतात. यामुळे साधक ध्यानप्रक्रिया समजून घेतो. संपूर्ण साधनेत कोणत्याही प्रतिकांचा प्रतिमेचा किंवा मूर्तीचा वापर केला जात नाही. माहिती पुस्तके, ध्यान केंद्रातही कुठेही कोणत्याही धार्मिक चिन्हाचा वापर केला जात नाही किंवा पूजापाठ व कर्मकांड केले जात नाहीत. फक्त हृदयावर लक्ष केंद्रित करून ध्यान कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जाते.

ध्यानाचे फायदे...

  • - आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरिक आरोग्य हे फळ आहे.

  • - ध्यानाने स्मरणशक्ती जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान आवश्यक

  • - ध्यानामुळे जीवनातील पराभव, अपमान आणि वेदनेमुळे न खचता शांत राहते.

  • - भरपूर आध्यात्मिक ऊर्जा वाढल्याने शारीरिक व मानसिक कार्यक्षमता वाढते

ध्यान केंद्रात शिस्तीचे दर्शन

सोलापूरहून अक्कलकोटकडे जाताना रस्त्यावर हार्टफुलनेस सेंटर या नावाचा फलक लागतो. या फलकापासून काही अंतरावर सहजमार्ग ध्यान केंद्र आहे. केंद्रात साधकांसाठी काही कुटी, ध्यानगृह व ग्रंथालय यांच्या प्रशस्त इमारती आहेत. दर रविवारी अनेक महत्त्वाच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्ती येथे फक्त साधक म्हणून हजर असतात. सर्व साधक शिस्तीत एक ओळीत पादत्राणे सोडतात. ध्यानगृहात शांततेत ध्यान करतात. ध्यान झाल्यानंतर अल्पोपाहार असतो यासाठी शिस्तीत सर्वजण उभे राहतात. आपापले ताट स्वच्छ करून ठेवतात. सेवाभावी वृत्तीने दिलेल्या देणगीतून आश्रमाचा खर्च भागवला जातो.

ध्यानामुळे होते मनाची स्वच्छता

सहज ध्यानमार्गाबद्दल माहिती सांगताना, श्री रामचंद्र मिशनचे विभागीय प्रमुख पुरुषोत्तम चन्ना यांनी सांगितले की, मी २००० सालापासून सहज मार्गात आहे. ध्यान केल्यामुळे अंतर्मन हलके होते. अंतर्मनाची स्थिरता वाढते. सामामन्यपणे मनुष्य दिवसभर भविष्य व भूतकाळातील गोष्टींचा विचार करतो. मात्र, ध्यान केल्याने मनुष्य वर्तमानात जगायला शिकतो. ध्यान मनाला वर्तमानकाळात घेऊन येते. अभ्यासात किंवा मन एकाग्र नसणे ही खूप मोठी समस्या असते. मात्र, ध्यानच मनाला एकाग्र करू शकते.बाहेरील वातावरणा नेहमी मनावर परिणाम होत असतो. ध्यानामुळे मनात ईश्वरीय प्रकाशाची निर्मिती होते. मनाची स्वच्छता होते. ध्यानामुळे मंदिर मनातच तयार होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT