minind shambhar 
सोलापूर

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा नवीन आदेश, आठवडे बाजार बंद, शनिवारी, रविवारी सर्व दुकाने पूर्णपणे बंद 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सुधारित आदेश काढला आहे. सोलापूर पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळून ग्रामीण भागासाठी हा आदेश काढला आहे. सोलापूरचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर हे देखील सोलापूर शहरासाठी आज सुधारित आदेश काढण्याची शक्‍यता आहे.

या आदेशातून अत्यावश्‍यक सेवा/मनुष्य व प्राणी मात्रासाठी जीवनावश्‍यक वस्तू, भाजीपाला व फळे, किराणा दूध व वृत्तपत्र वितरण या बाबींना या आदेशातून सुट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या या सुधारित आदेशानुसार आता जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात या वेळेत चालू राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडे व बाजार जनावरांचा बाजार बंद करण्यात आले आहेत. खाद्यगृह, परमिट रूम व बार फक्त सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत कोव्हिडच्या नियमांचे पालन करून 50 टक्केच्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

होम डिलिव्हरीसाठी किचन व वितरण कक्ष रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिम, व्यायाम शाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव हे वैयक्तिक सरावासाठी सुरू राहणार आहेत. सर्व प्रकारची धार्मिक स्थळेही सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहतील. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांच्याकडे लिलावासाठी येणाऱ्या कृषी मालाच्या प्रकारानुसार नियोजन करावे. एका दिवशी, एकाच वेळी लिलाव न करता शेत मालाच्या प्रकारानुसार लिलावाचा दिवस व वेळ विभागून द्यावी अशी सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली आहे. बाजार समित्यांमधील लिलावाच्या नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांवर सोपविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT