Nimgaon Road 
सोलापूर

भाजप-शिवसेना सरकारच्या काळात निधी मंजूर, तरीही रखडला निमगाव-पिलीव रस्ता ! 

नितीन मगर

निमगाव (सोलापूर) : अकलूज - निमगाव - पिलीव - इटकी या मंजूर रस्त्याचे काम सुरू करावे तसेच रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी निमगावच्या ग्रामस्थांनी केली आहे. 

अकलूज- निमगाव- पिलीव- इटकी हा प्रस्तावित राज्य मार्ग क्रमांक 153 असून, हा रस्ता दोन वर्षांपूर्वी भाजप- शिवसेना युतीच्या काळात मंजूर झाला आहे. या रस्त्यासाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. त्याच वेळी जांभुड - खंडाळी- निमगाव- मळोली (प्र.जि.मा. क्र. 89) याही रस्त्याचे काम मंजूर झाले होते. निमगाव ते मळोली रस्त्याचे काम झाले असून, खंडाळी ते निमगाव या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. परंतु, अकलूज- निमगाव- पिलीव- इटकी या रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. 

सद्य:स्थितीत या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. निमगावपासून दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा खडतर मार्गावरून वाहन कसे चालवायचे, असा प्रश्न वाहनधारकांसमोर पडला आहे. 

सध्या राजेवाडी, अकलूज, माळीनगर हे साखर कारखाने चालू आहेत. त्यांच्या उसाची वाहतूक याच रस्त्यावरून चालू असून, खड्ड्यांमुळे ट्रेलर पलटी होत आहेत. ट्रॅक्‍टर पंक्‍चर होत आहेत. त्यामुळे वाहतूक थांबून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील खडी,माती उघडीक पडल्यामुळे दुचाकी वाहने घसरून अनेकांना इजा झाली आहे. 

संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू करावे. जर या रस्त्यावर अपघाताने जीवितहानी झाल्यास याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील. यासाठी शाखा अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांना जीवित हानीस जबाबदार धरून भादंवि 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रही राहू, असे निमगाव येथील नागरिकांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

निमगाव ते पिलीव या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. रस्त्याचे काम मंजूर असूनही संबंधित विभागाने काम सुरू केलेले नाही. या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. भविष्यात या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी. 
- के. के. पाटील, 
माजी पंचायत समिती सदस्य, निमगाव 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT