Ayush
Ayush 
सोलापूर

लॉकडाउनचा सदुपयोग : नववीतील आयुषने बनवले कमी खर्चातील तुरीच्या शेंड्या खुडायचे यंत्र 

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : सुटीच्या कालावधीचा सदुपयोग करत येथील नूतन विद्यालयातील नववीतील विद्यार्थी आयुष अजय गोरे याने अगदी कमी खर्चात टाकाऊ वस्तूंपासून हाताळायला सोपे असलेले तुरीच्या शेंड्या खुडायचे यंत्र बनवले आहे. 

सध्या लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने मुलांना सुट्या आहेत. या सुट्यांमध्ये मुले वेगवेगळ्या कला आत्मसात करीत आहेत. या लॉकडाउनचा सदुपयोग असा झाला, की अनेक मुलांचे अंगभूत गुण बाहेर पडण्यास मदत झाली आहे. असेच नववीतील आयुष गोरे या विद्यार्थ्याचे अंगभूत गुण दिसून आले. तो सुटीत वडिलांसोबत शेतात फिरत होता. त्याला तुरीच्या शेंड्या कापल्यास त्याला उपफांद्या फुटून उत्पन्न सुमारे दीडपट वाढत असल्याचे समजले. परंतु शेंड्या कापण्यास मनुष्यबळ व खर्चही जास्त लागत असल्याचे समजले. त्याने याबाबत विचार करून घरातील उपलब्ध साहित्याचा उपयोग करत यंत्र तयार केले. परिसरातील अनेक शेतकरी या यंत्राचा उपयोग करत आहेत. 

या त्याच्या आविष्काराचे कुर्डुवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन प्रभाकर चिंचवडकर, अध्यक्ष वसंतराव कऱ्हाडे, आयुषचे मामा सुनील कऱ्हाडे, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत डंके, उपमुख्याध्यापिका अनिता मस्के, पर्यवेक्षक संजय यादव, आयुषची आत्या आरती कऱ्हाडे, वडील अजय गोरे व आई आशा गोरे यांनी अभिनंदन व कौतुक केले. 

हरभरा, कपाशी खुडण्याबरोबर गवतही कापता येते
आपल्या या यंत्राबद्दल आयुष म्हणाला, की यंत्रासाठी दीड इंच व्यासाचा प्लास्टिक पाइपचा तुकडा, ब्लेड, 12 होल्टची डीसी मोटार, 12 होल्ट चार्जिंग बॅटरी व फवारणी पंप लागतो. या यंत्रामुळे सहा शेतमजुरांचे शेंडे खुडण्याचे काम एकजण करू शकतो. या यंत्राच्या सहाय्याने हरभरा, कपाशी खुडण्याबरोबर गवतही कापता येते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT