Truckers 
सोलापूर

मोठी बातमी ! मालवाहतूक वाहनांना स्वतंत्र परवान्याची गरज नाही 

तात्या लांडगे

सोलापूर : माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना माल वाहतूक करण्याची परवानगी अगोदर आहेच. त्यामुळे अशा वाहनांना अटकाव करु नये. माल वाहतूक वाहनांना स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्‍यकता नाही, असे निर्देश राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी 31 मार्च रोजी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. 


कोरोना या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिक अत्यावश्‍यक सेवा तथा प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पासेस मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करु लागले आहेत. अर्जाचा ढिग पाहता पूर्वीच्या आदेशात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार एखादा नागरिक सध्या रहिवाशी जिल्ह्यांमध्ये अथवा त्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणार असल्यास त्याची कारणे शोधून संबंधित पोलिस उपायुक्‍त किंवा पोलिस अधिक्षकांनी त्याला परवानगी द्यावी, असे नव्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातून एखादा नागरिक दुसऱ्या राज्यात प्रवास करणे अत्यावश्‍यक असल्यास अशा नागरिकांनीच फक्‍त अत्यावश्‍यक सेवेसाठी परवानगी मिळण्याकरिता पोलिस महासंचालकांकडे रितसर अर्ज करावा, असेही नमूद करण्यात आले आहे. माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना यापूर्वीच परवानगी देण्यात आल्याने त्यांना पुन्हा परवानगी घेण्याची गरज नसल्याचेही श्री. भारंबे यांनी स्पष्ट केले आहे. 

केंद्रीय मुख्य सचिवांनीही दिले पत्र 
कोरोना या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणत्या वाहनास अथवा व्यक्‍तीस वाहतुकीसाठी परवानगी द्यावी, याबद्दल भारत सरकारचे मुख्य सचिव अजयकुमार भल्ला यांनी 29 मार्च रोजी देशातील सर्व राज्य सरकारांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी नवे आदेश दिले आहेत. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या वाहनचालकांना त्यांचे पत्र पाठविले जात असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT