सोलापूर : उत्तर सोलापूरच्या सभापती भडकुंबे विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर sakal
सोलापूर

सोलापूर : उत्तर सोलापूरच्या सभापती भडकुंबे विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर

उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभागृहात झाली बैठक; आता नव्या निवडीकडे लक्ष

संतोष सिरसट

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव आज तीन विरुद्ध एक अशा मताने मंजूर करण्यात आला.

उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या सभागृहात अविश्वास ठरावाच्या संदर्भातील सभा पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. सकाळी 11 वाजता सभेच्या कामकाजाची सुरुवात झाली. पीठासन अधिकारी निकम यांनी अविश्वास ठरावाबाबत हात उंचावून मतदान घेतले. त्यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने तीन सदस्यांनी हात वर केले तर विरोधात एक सदस्यांनी हात वर केला. त्यामुळे भाजपच्या सदस्य संध्याराणी पवार, राष्ट्रवादीचे सदस्य जितेंद्र शीलवंत, माजी आमदार दिलीप माने गटाचे सदस्य हरिदास शिंदे या तिघांनी एकत्र येऊन दाखल केलेला अविश्वासाचा ठराव तीन विरुद्ध एक अशा मताने मंजूर करण्यात आला.

चार सदस्य संख्या असलेल्या उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीच्या या सभागृहात सभापती भडकुंबे यांच्या विरोधात तीन सदस्यांनी एकत्र येत 8 ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. तो ठराव रद्द करण्यात यावा, अशी मागणी सभापती भडकुंबे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. मात्र त्यांच्या मागणीचा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी केला नाही. एवढेच नाही तर माजी आमदार दिलीप माने यांनीही या अविश्वासाच्या ठरावा संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा तालुक्यांमध्ये सुरू होती.

त्यामुळे अविश्वास ठराव बारगळणार की होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र आज सकाळी साडेअकरा वाजता सभापती भडकुंबे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे भडकुंबे यांनी केलेले प्रयत्न तोकडे ठरल्याचे आजच्या घडामोडी वरून दिसून येते.

आता सभापती निवडीकडे लक्ष

अविश्वास ठराव मंजूर झाल्या बाबतचे प्रोसिडिंग जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी नवा सभापती निवडण्याच्या संदर्भात सभा बोलावतील. त्यामुळे ती सभा केव्हा होईल याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आता नवा सभापती कोण होणार याबाबत तालुक्यात उत्सुकता आहे.

ठराव मंजूर झाल्यानंतर गोंधळ

अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर पंचायत समितीच्या सभागृहाबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या ठिकाणी दोन गटांमध्ये मारामारी झाल्याची चर्चाही सध्या सुरू आहे. नेमकं कुणी कुणाला मारलं हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. सदर बाजार पोलिस चौकीत गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT