Corona 
सोलापूर

पोलिस कारवाईतील ढिलाईमुळे होतेय "या' तालुक्‍यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ 

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ शहरासह ग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. विनामास्क मोकाट फिरणे, सुरक्षित शारीरिक अंतर न ठेवणे, सॅनिटायझरचा वापर न करणे आदी प्रकार सर्रास घडत आहेत. दंडात्मक कारवाईत ढिलाई आल्याने ही परिस्थिती उद्‌भवली असल्याची चर्चा नागरिकांत आहे. पोलिस प्रशासनाने पुन्हा हातात काठी घेऊन कारवाईचा फास आवळणे गरजेचे झाले आहे. मात्र, यात सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याची खबरदारी घ्यावी, अशा भावना व्यक्त होत आहेत. 

मोहोळ शहरासह ग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढती आहे. सर्वसामान्यांबरोबरच कोरोनाने महत्त्वाच्या कार्यालयातही हजेरी लावली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भीती पसरली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भाग याला अपवाद नाही. शहरासह ग्रामीण भागातूनही जणू कोरोना हद्दपार झाल्यासारखे नागरिक वावरत आहेत. शहरात कामासाठी येणाऱ्यांपेक्षा मोकाट फिरणाऱ्यांची संख्या वाढती आहे. त्यात तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. मोहोळ तालुका सोलापूर शहरापासून अत्यंत जवळचा तालुका आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांसह इतरांचे जाणे-येणे वाढते आहे. शासकीय कर्मचारी नियम पाळतात, मात्र सर्वसामान्याला त्याच्याशी काहीच घेणे-देणे नाही, अशी परिस्थिती आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्यांच्या मनात प्रशासनाबाबत दहशत होती. नगरपरिषद प्रशासनाने गेल्या दीड महिन्यापूर्वी छोट्या व्यापाऱ्याला लक्ष्य करत कारवाईचा फार्स केला, तोही सध्या बंद असल्याचे चित्र आहे. मात्र कारवाई पुन्हा सुरू करताना व्यापाऱ्यांना त्रास होईल असे कृत्य होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. रस्त्यावर फिरताना मास्कचा वापर करणे गरजेचे असताना याकडे कोणीही लक्ष देत नाही. बघता बघता तालुक्‍यात कोरोना व सारी बाधितांची संख्या 28 वर पोचली आहे. 

ग्रामीण रुग्णालयनिहाय रुग्णांची संख्या 
अनगर प्राथमिक आरोग्य केंद्र : 1 सारी, बेगमपूर - 1 सारी, कुरूल : आयएलआय 1 सारी 1, नरखेड - 4 सारी, पाटकुल - आयएलआय 3, सारी 1, शिरापूर : आयएलआय 1, सारी 2, सीपी 1, मोहोळ शहर : सीपी 8, आयएलआय 3, सारी 1.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Corruption News : पैसा डबल करण्याच्या आमिषाला पोलिसही बळी; एसपींच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांची नावे समोर, घटनेने खळबळ

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

VIDEO : 'गावातील अंबानी शेतकऱ्याचं घर'! 20 एकरातील आलिशान घर पाहून नेटकरीही थक्क; गाड्यांपासून घोड्यांपर्यंत सर्व काही इथे आहे...

Viral Video: किती गोड! आजोबांनी रेल्वेत आजीसाठी केलं असं काही... व्हायरल व्हिडिओ पाहून आनंदाश्रू उभे राहतील

'त्याने माझे खराब व्हिडिओ पोस्ट केले होते' सोशल मीडियाचा अनुभव सांगताना प्राजक्ता माळी म्हणाली...

SCROLL FOR NEXT