Inspector of Police esakal
सोलापूर

सोलापूर ग्रामीणमधील ११ पोलिस ठाण्यांचे प्रभारी बदलले! मोहोळ, वैराग, टेंभुर्णी, पंढरपूर, बार्शी, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे ‘हे’ अधिकारी प्रमुख, वाचा...

दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने, पदोन्नती आणि विनंती बदल्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ११ पोलिस निरीक्षक आणि दोन सहायक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होऊन त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने, पदोन्नती आणि विनंती बदल्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात ११ पोलिस निरीक्षक आणि दोन सहायक पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होऊन त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले आहेत.

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये अक्कलकोट उत्तर, सोलापूर तालुका, मोहाळ, टेंभुर्णी, वैराग, माळशिरस, पंढरपूर शहर व पंढरपूर तालुका, बार्शी तालुका पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. याशिवाय जिल्हा वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर पोलिस अशा पोलिस ठाण्यांचा देखील समावेश आहे. आषाढी वारीपूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. यात सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे व गणेश कड यांचाही समावेश आहे.

पोलिस अधीक्षकांनी या नव्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन दोन दिवसांत बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावे, असेही स्पष्ट केले आहे. बदलीच्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी बजावावी, गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रणात राहील, यादृष्टीने कामकाज करावे, असे निर्देश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. दरम्यान, याशिवाय काही दिवसांत ग्रामीणमधील आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.

‘या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या

  • अधिकारी पोलिस ठाणे

  • अविनाश पवार अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे (पूर्वीचे ठाणे : नियंत्रण कक्ष)

  • कुंदन गावडे सोलापूर तालुका पोलिस ठाणे (पूर्वीचे पोलिस ठाणे : वैराग)

  • दिपक पाटील मोहोळ पोलिस ठाणे ((पूर्वीचे पोलिस ठाणे : नियंत्रण कक्ष)

  • बाळू भरणे टेंभुर्णी पोलिस ठाणे (पूर्वीचे पोलिस ठाणे : वाहतूक शाखा)

  • अमुल कादबने वैराग पोलिस ठाणे (पूर्वीचे पोलिस ठाणे : नियंत्रण कक्ष)

  • दशरथ वाघमोडे माळशिरस पोलिस ठाणे (पूर्वीचे पोलिस ठाणे : पंढरपूर शहर)

  • तयुब मुजावर पंढरपूर शहर पोलिस ठाणे (पूर्वीचे पोलिस ठाणे : पंढरपूर तालुका)

  • सुरेश चिल्लावार पंढरपूर तालुका पोलिस ठाणे (पूर्वी : अक्कलकोट दक्षिण)

  • विकास दिंडुरे सायबर पोलिस ठाणे (पूर्वी : माळशिरस पोलिस ठाणे)

  • दिपक बरडे जिल्हा वाहतूक शाखा (पूर्वी : जिल्हा वाहतूक शाखा)

  • कमाकर गड्डिमे आर्थिक गुन्हे शाखा (पूर्वीचे पोलिस ठाणे : आर्थिक गुन्हे शाखा)

  • अक्षय सोनवणे बार्शी तालुका पोलिस ठाणे प्रभारी (पूर्वी : पंढरपूर तालुका)

  • गणेश कड सोलापूर तालुका पोलिस ठाणे (पूर्वी : आर्थिक गुन्हे शाखा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : १२ वर्षांत पाईपद्वारे गॅस जोडणीचा विस्तार, १.७५ कोटी कुटुंबांना लाभ

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

Tricolor Cheese Toast Recipe: या स्वातंत्र्यदिनाला नाश्त्यात करा काहीतरी हटके! १० मिनिटांत बनवा चीजने भरलेला ‘तिरंगा टोस्ट’

Career Horoscope: सरकारी नोकरीत मिळवतात यश; ‘या’ राशींना मिळते नशिबाची साथ, करिअरमध्ये करतात मोठी प्रगती, तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT