1Corona_93_0.jpg 
सोलापूर

कोरोना रुग्णांचे एकाच दिवसात दीड शतक ! ग्रामीण मध्ये 115 तर शहरामध्ये 41 रुग्ण

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याचे चित्र दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे. मागील दहा दिवसात शहर-जिल्ह्यात 100 च्या सरासरीने एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे 20 रुग्णांचा कोरोनामुळे या काळात मृत्यू झाला आहे. आज एकाच दिवसात शहरात 41 तर ग्रामीण भागामध्ये 115 रुग्ण आढळले आहेत.

ठळक बाबी...

  • शहरात 858 संशयितांमध्ये 41 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
  • ग्रामीणमध्ये एक हजार 854 संशयितांमध्ये आढळले तब्बल 115 पॉझिटिव्ह
  • शहर जिल्ह्यात एकाच दिवसात वाढले 156 रुग्ण; दिलासादायक बाब म्हणजे एकही मृत्यू नाही
  • रुग्ण वाढीत माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी आणि पंढरपूर जिल्ह्यात अव्वल
  • दहा दिवसात शहर-जिल्ह्यात वाढले एक हजार 10 रुग्ण

सोलापूर शहरात आज मंगळवार पेठ, सहवास नगर, उत्कर्ष नगर, विश्वकरण पार्क (जुळे सोलापूर), साई बाबा चौक, मंत्रीचंडक (होटगी रोड), पाटील नगर (हैदराबाद रोड), वृंदावन सोसायटी (सम्राट चौक), कविता नगर, न्यू पाश्चा पेठ, अशोक चौक, दक्षिण कसबा (जैन मंदिराजवळ), कित्तूर चन्नम्मा नगर (सैफुल), उत्तर कसबा, अवंती नगर (मुरारजी पेठ), शिवाजीनगर (पूना रोड), रविवार पेठ, उत्तर सदर बझार, मार्कंडेय नगर (कुमठा नाका), दमानी नगर, उमा नगरी, पापाराम नगर (विजयपूर रोड), ट्विंकल शाळेजवळ (जुळे सोलापूर), मोदीखाना मशिदीजवळ, चंद्रलोक नगर, कृषी नगर (विकास नगर), मेहता रेसिडेन्सी (आरटीओ कार्यालयाजवळ) आदित्य नगर, इंदिरानगर, सिटीझन पार्क (विजयपूर रोड), कोनापूरे चाळ (रेल्वे लाईन), जवळकर वस्ती (सम्राट चौक), अक्कलकोट रोड, विडी घरकूल, करवे नगर (देगाव) आणि शिवगंगा चौक (नेताजी शाळेसमोर) या ठिकाणी नवीन रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे आज (बुधवारी) अक्कलकोटमध्ये चार, बार्शीत 16, करमाळ्यात 14, माढ्यात नऊ, माळशिरसमध्ये 30, मंगळवेढ्यात तीन, मोहोळमध्ये 12, उत्तर सोलापुरात दोन, पंढरपुरात 20, सांगोल्यात एक आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात चार रुग्ण सापडले आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT