सोलापूर

पंढरपूर तालुक्यात गोळीबार; माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू (Video)

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्यातील भाळवणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विश्वास बबन भागवत (वय 35) यांच्यावर अज्ञात लोकांनी गोळीबार केला. या गोळीबारात भागवत यांचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास भाळवणी गावातील जिल्हा परिषद शाळेत समोर घडली.
या गोळीबार प्रकरणाची समजलेली माहिती अशी की विश्वास बबन भागवत वय (३५) हे भाळवणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत. त्यांचा ठेकेदारी चा व्यवसाय आहे. 

आज दुपारी बाराच्या सुमारास भाळवणी गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर ते काही लोकांच्या समवेत बसलेले असताना मोटारसायकलवरून दोन अज्ञात मारेकरी आले आणि त्यांनी जवळून विश्वास भागवत यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या भागवत यांना उपचारासाठी तातडीने पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर करण्यात आले. शेतीच्या या वादातून भागवत यांची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. पंढरपूर  ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत भस्मे हे पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: ईव्हीएमबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

IPL 2024 DC vs MI Live Score : अखेर मुंबईला मिळालं पहिलं यश; आक्रमक खेळणाऱ्या फ्रेझर-मॅकगर्कचं शतक हुकलं

Gurucharan Singh: गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट; सीसीटीव्ही फुटेज लागलं पोलिसांच्या हाती

SCROLL FOR NEXT